मनोज शेलार
नंदुरबार : दारू पिऊन घराजवळ आरडाओरड करणाऱ्या एकास रागाच्या भरात दरीत ढकलून देत ठार केल्याची घटना वलवाल, ता.धडगाव येथे रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी मंगळवारी एकाविरुद्ध धडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेतील मयताचे नाव अमरसिंग डेका पावरा (२८) रा.वलवाल रिचबारीपाडा, ता.धडगाव असे आहे. याबाबत पोलिस सूत्रांनुसार, मयत अमरसिंग पावरा हा दारू पिऊन नटवर ओजाऱ्या पावरा (४३) यांच्या घराजवळ दारूच्या नशेत आरडाओरड करीत होता. यावेळी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला असता वाद होऊन रागाच्या भरात नटवर यांनी अरमसिंग यांना खोल दरीत ढकलून दिले. त्यात अरमसिंग यांचा मृत्यू झाला. याबाबत डेका मोलजी पावरा यांनी धडगाव पोलिसात फिर्याद दिल्याने नटवर पावरा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक आर.एन.पठाण करीत आहे.