लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आॅनलाइन नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी तात्काळ आधार क्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद करून प्रोफाईल अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी या संकेतस्थळावर सुरू आहे. उमेदवारांनी आॅनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने संकेतस्थळावर उपलब्ध सुविधा आणि माहितीचा लाभ घेता येतो.उमेदवारांनी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक संकेतस्थळावर आपल्या प्रोफाईलमध्ये भरावा. प्रोफाईल अद्ययावत न केल्यास नाव नोंदणी ३१ आॅगस्ट अखेर रद्द होईल.अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात, नंदुरबार येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सुशिक्षीत बेरोजगारांच्या नोंदणीत आता आधार क्रमांक सक्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:48 PM