लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरात कोरोना पॉाॉङिाटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आह़े शहरात केवळ दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले असून प्रभाग क्रमांक दोन पूर्णपणे सील करण्यात आला आह़े गुरुवारी याठिकाणी ग्रामपंचायत मार्फत निजर्तुकीकरण करण्यात आले तर आरोग्य विभागाने घरोघरी सव्रेक्षण सुरु केले आह़े अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये कोरोना ूसंसर्ग झालेली 32 वर्षीय महिला रुग्ण आढळून आली आह़े यातून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी गुरुवारपासून खबरदारीच्या उपायांना वेग देण्यात येत आह़े यातंर्गत प्रभाग दोन कंटेन्मेंट झोन तर आसपासच्या परिसराला बफर झोन घोषित करण्यात आले आह़े तहसीलदार विजय कच्छवे यांच्या आदेशानंतर हा परिसर सील करण्यात आला होता़ तर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 21 जणांना नंदुरबार येथे क्वारंटाईन करण्यात आले आह़े पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांनीही या भागात भेटी देत माहिती घेतली होती़ दरम्यान ग्रामपंचायतीने निजर्तुकीकरण केल्यानंतर आरोग्य विभागाने तपासणी व सव्रेक्षणाचे काम सुरु केले आह़े प्रशासनाने अक्कलकुवा मक्राणीफळी, सोरापाडासह अक्कलकुवा शहर आणि लगतचा पाच किलोमीटरचा परिसर पूर्णपणे सील केला आह़े 24 तारखेर्पयत हा परिसर सील राहणार आह़े अत्यावश्यवक सेवा वगळता सर्वच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने गुरुवारी गर्दीवर नियंत्रण आले होत़े कोरोना पॉङिाटिव्ह रुग्ण आढळलेल्या प्रभाग दोनमधील कोंडवाडा गल्ली, दर्गा रोड, फेमस चौक, हवालदार फळी या भागावर पोलीसांची नजर असून जागोजागी बॅरीकेटींग केले गेले आह़े सकाळी बॅरीकेटींग ओलांडून कोणी बाहेर येऊ नये जागोजागी पोलीस तैनात होत़े पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी पथकासह सर्व परिसराच्या चौफेर गस्त सुरु ठेवली होती़ गुरुवारी दिवसभरात सरपंच राजेश्वरी वळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩडी़बोडके, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार विजय कच्छवे, गटविकास अधिकारी सी़क़ेमाळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वपAील मालखेडे, उपसरपंच मुन्ना मक्राणी यांनी भेटी देत सव्रेक्षणाची माहिती घेतली होती़
अक्कलकुव्यात सव्रेक्षण आणि निजर्तुकीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:49 PM