शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
2
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
3
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
4
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
5
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
6
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
7
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
8
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
9
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
10
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
11
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
12
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
13
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
14
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
15
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
16
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
17
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
18
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
19
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
20
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

राज्यमार्गावरील सोमावल ते अक्कलकुवा दरम्यान अपघातांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:13 PM

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ते सोमावल गावादरम्यान भरधाव असणारा हा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये चालक व सहचालक असे दोन जण होते. समोरून येणा:या कंटेनरने साईड न देता कट मारल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत उलटला, अशी माहिती सहचलकाने दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की, हा ट्रक पूर्णपणे उलटून चारही चाके वरच्या दिशेला झाली. चालक व सहचालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकले. इतर वाहन चालकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात चालक व सहचालक यांना कोणतीही  गंभीर दुखापत झाली नाही. इर्शाद व मोहंमद सैबाझ (दोघे रा.अहमदाबाद, गुजरात) अशू त्यांची नावे   असल्याचे सांगण्यात आले. त्यांना या अपघातात किरकोळ जखमा झाल्या आहेत. सकाळी मोदलपाडा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी किसन वळवी, गुलाबसिंग वसावे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रकची पाहणी केली.  पुढील पोलीस कार्यवाही केली.अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर तळोदा ते खापर दरम्यान वर्षभरापासून भरधाव ट्रक उलटण्याचे सत्र सुरू आहे. मात्र संबंधित विभागाने पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतली आहे. दर दिवसाआड राज्यमार्गावरील तळोदा ते खापरदरम्यान अपघात होत आहेत.   2 फेब्रुवारी रोजी जामली फाटय़ाजवळील वळणावर खताचा ट्रक उलटला होता तर 9 मार्च रोजी याचठिकाणी पपईने भरलेला ट्रक उलटल्याने डिङोलची टाकी फुटून ट्रक पेटला होता. अशाप्रकारे दर महिना-पंधरा दिवसांनी तळोदा ते खापर दरम्यान अपघाताचे सत्र नेहमीचे झाले आहे. बेशिस्त वाहतूक व अनियंत्रित वेग, ओव्हरलोड भरलेली वाहने,          अप्रशिक्षित व मद्यपी चालक, परिवहन व पोलीस वाहतूक शाखेचे याकडे असणारे दुर्लक्ष ही या अपघातांच्या मालिकेमागील कारणे असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरापासून ट्रक उलटण्याचे सुरू असणारे सत्र थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत   नाही.