लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार येथील भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात वीज चोरी उघडकीस आली़ वीज मीटरचा तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या अधिका:यांनी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़ शहादा शहरातील डी़डी़रोड भागात वीजचोरी होत असल्याची माहिती भरारी पथकाला 24 सप्टेंबर रोजी मिळाली होती़ त्यानुसार पथक प्रमुख गजानन कोष्टी यांच्यासह कनिष्ठ अभियंता शेख अफसर मजहर, सहायक सुरक्षा अंमलबजावणी अधिकारी कैलास राठोड, तंत्रज्ञ निलेश पाटील, सचिन पाटील यांनी ईस्माईल अब्दुल रज्जाक यांच्या घरी तपासणी केली होती़ यावेळी वीजमीटर हे मंदगतीने सुरु असल्याचे पथकाला दिसून आले होत़े पथकाने मीटर काढून तपासणी केली असता, त्यात मीटरची गती मंद करण्यासाठी काही तांत्रिक बदल करण्यात आल्याचे पथकाला दिसून आल़े ग्राहकाने मीटरच्या मूळ रचनेत फेरबदल करुन निष्पन्न झाल्याने तातडीने मीटर जप्त करुन कारवाई करण्यात आली़ यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला होता़ संबधित ईस्माइल अब्दुल रज्जाक यांनी 16 महिन्यात 4 हजार 293 युनिटची वीजचोरी करत वीज वितरण कंपनीचे 68 हजार 560 रुपयांचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले होत़े याप्रकरणी पथकप्रमुख कोष्टी यांनी मंगळवारी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ईस्माईल अब्दुल रज्जाक याच्याविरोधात विद्युत कायदा 200 गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संबधिताकडून इतर ठिकाणी वीज पुरवठा दिल्याने त्यासाठी 1 लाख 46 हजाराची रक्कम दंड म्हणून आकारली जाऊ शकत़े
वीज वितरण कंपनीकडून सध्या जिल्ह्यात मीटर बदलाची कारवाई सुरु आह़े जुने मीटर काढण्यापूर्वी कंपनीकडून त्यांची तपासणी करुन सरासरी वीज वापराची माहिती संकलित करण्यात येत़े यात दोषी आढळलेल्या वीजग्राहकांना तातडीने नोटीसा देण्यात येत आहेत़