नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत 1 लाख 22 हजार रूपयांचे अवैैध मद्य जप्त करण्यात आले आह़े मद्य विक्री आणि वाहतूक करणा:या सात जणांविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत़ या कारवाईत पथकाने विदेशी व देशी मद्याच्या बाटल्या, बियर, 150 किलो महूफुले तसेच एमएच 39 जे 1532 तिनचाकी रिक्षा असा 1 लाख 22 हजार 890 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ ही कारवाई खेडदिगर येथील राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक मनोज संबोधी, सहायक दुय्यम निरीक्षक मोहन पवार, राहुल साळवे, तुषार सोनवणे, धनराज पाटील, हंसराज चौधरी, अजय रायते, नितीन ठणके यांच्या पथकाने केली़ याप्रकरणी नरेंद्र भानुदास चौधरी रा़खापर ता़ अक्कलकुवा, मुकेश पोपट चौधरी ङोंडा चौक, अक्कलकुवा, भगवान ठाणसिंग गिरासे रा़ सारंगखेडा, ुिदलीप भगवान पाटील रा़ बाजार गल्ली, शहादा, आबा पांडू पाटील रा़ अनरद ता़ शहादा, मुकेश धनराज माळी, रा़ सोनवद ता़ शहादा आणि सुक्राम हुपडय़ा वळवी रा़ बिजगाव ता़ नवापूर यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े
नंदुरबारात अवैध मद्य विक्री व वाहतूकीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:59 PM