शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

विनाकारण फिरणाऱ्या ४१ वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रविवारी सकाळी नऊ ते रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रविवारी सकाळी नऊ ते रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याने शहरात सर्व व्यवहार बंद होते. रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता. मुख्य बाजारपेठ व ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. तरीदेखील काही नागरिक सकाळी मोटारसायकलीने फेरफटका मारताना दिसून आले. विनाकारण फिरणाºयांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. दुपारनंतर मात्र शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची साखळी तोडण्यासाठी शहरात रविवारी सकाळपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यात रुग्ण संख्या ७० पर्यंत पोहोचली असून त्यात काहींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून नागरिक ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस शहर पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने रविवारी संचारबंदी लागू करण्यात आली होती. औषधांची दुकाने, दवाखाने व दूध विक्री वगळता सर्वच प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एरव्ही संचारबंदीतही हातगाड्यांवर भाजीपाला व फळे विक्री करणाºया विक्रेत्यांनीही संचारबंदीचा धसका घेत आपले व्यवसाय बंद ठेवले होते.संचारबंदी व जनता कर्फ्यूचे आदेश असतानाही शहरात विनाकारण मोटारसायकल घेऊन फिरणाºया ४१ मोटारसायकलस्वारांवर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व पोलीस कर्मचाºयांनी शहरातील ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. कारण नसताना फिरणाºयांना आडवून चौकशी केली जात होती. योग्य कारण असले तर सोडून दिले जात होते अन्यथा दंडात्मक कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात आली. काही अतिउत्साही नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचा प्रसादही दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ४१ वाहन चालकांकडून सुमारे २३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई वाहतूक शाखेचे कर्मचारी दादाभाई साबळे, अजय पवार, मनिंदर नाईक, तोसिफ शेख, विकास चौधरी, अतुल देसले यांच्या पथकाने केली.प्रशासनाने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रशासनाच्या साथीने शहरात कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहादा कोरोनाचे हॉटस्पॉट होऊ नये यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले. रविवारी सकाळपासूनच महसूल, पोलीस व पालिकेच्या कर्मचाºयांचे पथक शहरातील विविध भागात फिरून जनता कर्फ्यूला साथ देण्याचे आवाहन करीत होते. या वेळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे,पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, मंडळ अधिकारी पी.बी. अमृतकर सकाळपासूनच शहरात संचारबंदीबाबत माहिती घेत रात्री उशिरापर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.शहादा शहरातील वृंदावननगरमधील ५३ वर्षीय पुरुषाचा कोरोनाचे उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात शनिवारी मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वीही कुंभारगल्लीतील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे हे दोन्ही परिसर पूर्ण सील करण्यात आले आहेत. वृंदावननगरमधील मयत रुग्ण हे मंदाणे येथील मूळ रहिवासी आहेत. मात्र त्यांचे वास्तव्य शहादा येथे होते. या मयत रुग्णाची पत्नी, मुलगा, सून व नातू यांना आधीच विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत शहरात तीन व तालुक्यातील ग्रामीण भागात चार असे सात जण कोरोनाचे बळी पडले आहेत. शनिवारी रात्री उशिरा तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हे तिन्ही रुग्ण गरीब-नवाज कॉलनीतील आहेत. त्यामुळे हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहत असून सहा दिवसात सात रुग्ण आढळून आले. पाडळदा येथेही दुसरा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.