लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील आमलाड येथे 575 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला़ आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा जंबो विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता़ तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. हिना गावीत होत्या़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजयकुमार गावित, प्रकल्पाधिकारी विनय गौडा, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी, भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष अमृतसिंग पावरा, जयवंत पाडवी, हुसेन पाडवी, आमलाडचे सरपंच सदाशिव ठाकरे उपस्थित होत़े प्रास्ताविकात प्रकल्पाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तीन तालुक्यात 87 टक्के आदिवासी बांधव राहतात़ आर्थिक परिस्थिती खालावलेल्या आदिवासी बांधवांना लग्नासाठी फार खर्च येतो़ त्यांचा हा खर्च कमी व्हावा, यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आह़े डॉ़ विजयकुमार गावित यांनी सांगितले की, ही योजना राज्यात मंत्री असताना सुरू केली होती़ आदिवासी समाज बांधवांसाठी अनेक योजना ह्या सुरू केल्या त्यामुळे आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न सुटले आहेत़ खासदार डॉ़ हीना गावित यांनी सांगितले की, केंद्रशासनाने गर्भवती मातांसाठी अमृत आहार योजना सुरू केली आह़े या योजनेचा महिलांनी लाभ घेतला पाहिज़े गर्भवती महिलांनी दवाखान्यात नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून रूग्णालयांमध्ये त्यांच्या सर्व चाचण्या पूर्ण होऊन त्यांच्यावर त्या रूग्णालयात उपचार करणे सोपे होईल़ यासोबतच महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्य आजारी पडला तर दोन लाखापयर्ंतचा खर्च मिळेल़ सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी आर्थिक बचत होऊन अनिष्ट चालीरितींनाही फाटा देता येणार आह़े सामूहिक विवाहमुळे वाचलेला व मिळालेला पैसा आपल्या भविष्य यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने सोहळ्यात अधिकाधिक तरुणांनी सामील व्हाव़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.डी. पाटील केले. कार्यक्रमास धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातून आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े प्रकल्प कार्यालय प्रशासनाकडून वसतीगृहाला लागून असलेल्या मैदानात पार्किगची व्यवस्था केली होती़ याठिकाणी कर्मचा:यांसोबतच वसतीगृहाचे विद्यार्थी स्वयंसेवक विविध कामे करत होत़े जेवण आणि इतर सर्व सुविधा देण्यासाठी विद्याथ्र्यानी मार्गदर्शन केल़े विद्याथ्र्यानी स्वच्छतेबाबतही जनजागृती केली़
आमलाड येथे उपक्रम : तळोदा प्रकल्प कार्यालयाने केले कन्यादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 5:16 PM