लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात खत, बियाणे कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांनी बोगस खत-बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना खरीप आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केली़ शेतक:यांना जादा दराने विक्री झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला़जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ़ बी.एन. पाटील, कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, मोहिम अधिकारी तसेच खत, बियाणे कंपनीचे प्रतिनिधी व घाऊक विक्रेते उपस्थित होते. बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले की, बोगस खते, बियाणे विक्री करतांना विक्रेते आढळून आल्यास तात्काळ कायदेशिर कारवाई करण्यात येईल. कृषी विभागाच्या अधिका:यांनी वेळोवेळी तपासण्या करुन अवैध धंदे करणा:यांवर कारवाई करावी़ जिल्ह्यात शेतक:यांनी परवानाधारक विक्रेत्यांकडून खत-बियाणे खरेदी कराव़े जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ़ पाटील यांनी खत आणि बियाणे पुरवठय़ाची माहिती देत सूचना केल्या़
खत व बियाणे विक्रीवर राहणार प्रशासनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:09 PM