शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

८७ ग्रा.पं.वर होणार प्रशासकाची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 1:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ८७ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. एप्रिल ते जून या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ८७ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणाºया ३८ ग्रामपंचायतींवर अगोदरच प्रशासकाची नियुक्ती झाली असून, आता जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाºया ४९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे.राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वच निडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ग्रामविकास विभागाकडून मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे निकष व कार्यपद्धतीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील २२, शहादा २७, धडगाव १६, नवापूर १४, तळोदा सात तसेच अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.ग्रामविकास विभागाचे उपसचिव ए.का. गागरे यांनी परिपत्रक जारी केले असून, त्यात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने प्रशासक म्हणून योग्य व्यक्तींची नियुक्ती करण्याबाबत आदेश दिले आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तींची प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कायरक़ारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. या प्रशासकाची नियुक्ती संबंधित जिल्ह्याचे पालकमनत्री यांच्या सल्ल्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नंदुरबार जिल्ह्यात मुदत संपणाºया ८७ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येत आहे. १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीत मुदत संपणाºया ३८ ग्रामपंचायतींवर या अगोदरच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात नवापूर तालुक्यातील धनराट, धुळीपाडा, वडकळंबी, उकळापाणी, रायंगण, कोठडा, नांदवण, उमराण, चेडापाडा, बंधारपाडा, केळी, ढोंग, पळसून, सागाळी. शहादा तालुक्यातील असलोद, न्यु असलोद, राणीपूर, नागझिरी, कोटबांधणी. तळोदा तालुक्यातील बंधारा, पाडळपूर, राणीपूर. धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रूक, भोगवाडे खुर्द, उमराणी बुद्रूक, घाटली, खामला, काकरदा, आचपा, मुंदलवड, मनवानी बुद्रूक, खर्डा, सिसा, काकरपाटी, पाडली, वरखेडी बुद्रूक, कुंडल, हातधुई या ३८ ग्रामपंचायतींवर या अगोदरच प्रशासाकची नियुक्ती करण्यात आली आहे तर १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२० या कालवधीत मुदत संपणाºया नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे, तलवाडे खुर्द, भादवड, कोपर्ली, कंढरे, कार्ली, भालेर, हाटमोहिदा, खोंडामळी, खर्देखुर्द, शनिमांडळ, खोक्राळे, मांजरे, निंभेल, नगाव, काकर्दे, विखरण, बलदाणे, सिंदगव्हाण, तिलाली, न्याहली, आराळे. अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा, रेवानगर, सरदारनगर, दोंडवाडे, नांदरखेडा, पुसनद, फेस, बामखेडा, बामखेडा त.त., मनरद, मोहिदे त.श., वरढे त.श., शेल्टी, सारंगखेडा, सोनवद त.श. हिंगणी, कानडी त.श., कौठळ त.सा., कुकावल, कोठली त.सा, कुºहावद अशा ४९ ग्रामपंचायतींवर आता प्रशासकाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या पंचायतींवर प्रशासकानची नियुक्ती होणार आहे.प्रशासक म्हणून ज्या व्यक्तींची निवड करण्यात येईल, ती व्यक्ती त्या गावातील रहिवासी व गावाच्या मतदार यादीत त्याचे नाव असणे आवश्यक आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांना प्रशासक म्हणून नियुक्त करता येणार नाही. महाराष्टÑ ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार जे अधिकार, कर्तव्य सरपंचास प्राप्त होतात ते अधिकार व कर्तव्य प्रशासकास असणार आहे. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती प्रशासक पदाच्या कालावधीत संबंधित ग्रामपंचायतच्या सरपंचास अनुज्ञेय असलेले मानधन व इतर भत्ते आहरीत करेल. प्रशासक नियुक्तीलाही पर्यायी व्यवस्था असल्यामुळे प्रशासकाचे पद कोणत्याही प्रवर्गासाठी राखीव ठेवता येणार नाही. ज्या दिवशी विधीग्राह्यरित्या गठित झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल. त्या दिवसापासून प्रशासक पद व अधिकार तत्काळ संपुष्टा येतील.