ऑनलाईन लोकमतनंदुरबार,दि.13 - तळोदा ते नंदुरबार दरम्यान तापी नदीवर असलेल्या हातोडा पुल नागरिकांनी खुला केल्यानंतर पुलावर सेल्फी काढणा:यांसह प्रवास करणा:यांची रविवारी गर्दी झाली. मात्र काही तासांतच सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पुल रहदारीसाठी बंद केल्याने वाहनधारकांची निराशा झाली. 15 ऑगस्टर्पयत पुलाचे लोकार्पण न झाल्यास काँग्रेसतर्फे उद्घाटन करण्याचा इशारा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला आहे.नंदुरबार ते तळोदा हे अंतर 10 किलोमीटरने कमी करण्यासाठी गुजरात हद्दीत हातोडा ते सज्जीपूर गावांदरम्यान पुलाचे बांधकाम 2007 पासून सुरू करण्यात आले होत़े 10 वर्षापासून या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होण्याची प्रतिक्षा होती़ गेल्या एक वर्षापासून अंतिम टप्प्यात बांधकाम आल्याने अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या वारंवार भेटी व पाहणी दौरे पुलावर वाढले होत़े यात वेळावेळी पुल ‘अमक्या’ तारखेला सुरू होणार अशी माहिती दिली जात असल्याने तळोदा तालुक्यासह दुर्गम भागातील नागरिकांमध्ये उत्साह संचारत होता़ धडगाव ते नंदुरबार हे अंतर कमी होणार असल्याने पुलाच्या अपूर्ण बांधकामावर चर्चा रंगत होत्या़ मात्र अखेर रविवारी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती तळोद्यात समजल्यानंतर वाहनधारकांचे लोंढे पुलावरून जात होते. रविवार असल्याने पुलाला पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होत़े यातच काहींनी नंदुरबारकडे जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचा:यांनी अटकाव करत पुलावर मोठा अडथळा केला आह़े अजिबात न हलणा:या अडथळ्यामुळे निराशेनेच दुचाकीस्वार परत गेल़े पुलावर दिवसभर सेल्फी काढून ती एकमेकांना पाठवण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून आल़े या पुलाच्या अधिकृत उद्घाटनची तारीख अद्याप जाहिर झालेली नसली, तरी जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी येत्या काही दिवसात उद्घाटन करून पुलावरून वाहतूक करणार असल्याचे यापूर्वीच जाहिर केले आह़े काँग्रेस करणार उद्घाटन- आमदार रघुवंशी 10 वर्षाच्या दीर्घ मुदतीनंतर पूर्ण होणा:या हातोडा पुलाचे 15 ऑगस्टर्पयत उद्घाटन न केल्यास काँग्रेसचे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी हे कार्यकत्र्यासह हातोडा पुलाचे उद्घाटन करणार असल्याची घोषणा आमदार चंद्रकांत रघुंवशी यांनी केली आह़े येथे रविवारी बटेसिंह रघुवंशी उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली़
10 वर्षानंतर पुलाचे काम, नवीन पुलावर वाहनधारकांची सेल्फी मात्र उद्घाटन न झाल्याने बांधकाम विभागाने केली रहदारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 6:27 PM
हातोडा पुल 15 ऑगस्टर्पयत नागरिकांसाठी खुला न केल्यास काँग्रेसतर्फे उद् घाटन करण्याचा इशारा
ठळक मुद्देहातोडा पुलाच्या लोकार्पणासाठी तारीख पे तारीखबांधकाम पूर्ण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहनधारकांची पुलावर गर्दी.15 ऑगस्टर्पयत लोकार्पण न झाल्यास काँग्रेसने दिला उद्घाटन करण्याचा इशारा