बंदीनंतरही नंदुरबारात प्लॅस्टिक पिशव्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 1:14 PM
नंदुरबार शहरातील स्थिती : कारवाई आवश्यक, व्यावसायिकांकडून चोरुन होतोय वापर
<p>नंदुरबार : संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकच्या ठराविक वस्तू तसेच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असली, तरी नंदुरबारात मात्र याचा अद्यापही वापर होताना दिसत आह़े नंदुरबार शहरातील व्यावयायिकांकडून चोरुन-लपून प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर होत आह़े बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक साहित्यांच्या वापराबाबत ‘लोकमत’तर्फे सव्रेक्षण करण्यात आल़े शहरातील भाजीपाला व्यावसायिक, विविध लॉरी लावत खाद्य पदार्थाची विक्री करणारे व्यावसायिक, किराणा दुकानदार आदींकडून अद्यापही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र नंदुरबार शहरात दिसून येत आह़े गुढीपाडव्यानंतर संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी कायदा लागू करण्यात आला होता़ त्यानंतर व्यावसायिकांकडे शिल्लक असलेला माल संपवण्यासाठी साधारणत तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता़ त्यानंतर बंदी घातलेल्या प्लॅस्टिक मालाची विक्री व साठवणूक करणा:यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नंदुरबार पालिकेतर्फे देण्यात आला होता़ त्यानुसार पालिकेच्या पथकाकडून एक-दोन ठिकाणी कारवाईदेखील करण्यात आली होती़ परंतु अद्यापही शहरातील बहुतेक व्यावसायिकांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा असल्याचे निदर्शनात येत आह़े व्यावसायिकांकडून चोरुन-लपून बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून सामान देण्यात येत आह़े नंदुरबारात रात्रीच्या वेळी लॉरीवर विविध खाद्य पदार्थाची विक्री करण्यात येत असत़े अशा व्यावसायिकांकडे मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आह़े त्याच सोबत भाजीपाला विक्रेत्यांकडेसुध्दा पिशव्या आढळून येत आह़े त्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा कायदा असूनही नंदुरबार पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतेय असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित करण्यात येत आह़े नंदुरबार पालिकेतर्फे केवळ नावाला म्हणून एक ते दोन कारवाई करण्यात आलेली आह़े त्यानंतर मात्र प्लॅस्टिक बंदीबाबत पालिकेतर्फे कमालीची उदासिनता असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबार पालिकेतर्फे प्लॅॅस्टिक बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आलेली आह़े पथकाने शहरातील विविध व्यावसायिक तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करणे अपेक्षी आहेत़ परंतु तसेच होत नसल्याचे दिसून येत आह़े शहरातील सुभाष चौक, मंगळबाजार, जळका बाजार, तुप बाजार आदी परिसरात विविध व्यवसाय करीत असलेल्या व्यावसायिकांकडे बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशव्या दिसत आहेत़