नंदुरबारात पालिका निवडणुकीत अर्ज छाननीनंतर प्रचाराला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:46 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : छाननीनंतर आता जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रभागनिहाय चित्रही आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी प्रचाराला वेग दिला. उमेदवारी अर्जाची छाननी शनिवारी करण्यात आली. त्यानंतर चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे. राजकीय पक्षांतर्फे ...
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : छाननीनंतर आता जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रभागनिहाय चित्रही आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधून अनेकांनी प्रचाराला वेग दिला. उमेदवारी अर्जाची छाननी शनिवारी करण्यात आली. त्यानंतर चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे. राजकीय पक्षांतर्फे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत ए.बी.फॉर्म देण्याची मुदत होती. त्या मुदतीत अधिकृत उमेदवारांना ए.बी.फॉर्म देण्यात आल्याने आता इतर उमेदवार व डमी उमेदवार अर्ज माघार घेतील. परिणामी प्रत्येक प्रभागातील चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी प्रचारावर जोर दिला आहे.जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहचण्यासाठी प्रत्येकाचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी घरातील मंडळींसह उमेदवार आपापल्या प्रभागात जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रचार रॅलींचा सपाटाछाननी झाल्यानंतर पहिलाच रविवार आल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या उमेवारांनी सुटीचा पुरेपूर उपयोग घेण्याचा प्रय} केला. सकाळच्या व सायंकाळच्या सत्रात अशा दोन सत्रात प्रचार रॅली काढण्यात आली. जास्तीत जास्त भागात जावून प्रचार करण्याचा प्रय} करण्यात आला. दुपारच्या वेळी ऊन असल्यामुळे दोन तास विश्रांती घेण्यात आली. या वेळेत प्रचार कार्यालयात कार्यकर्ते आणि नियोजनकर्ते यांच्याशी चर्चा करून नेत्यांनी त्यांना सुचना दिल्या.वेगवेगळ्या रॅलीत सहभागीएकाच कुटूंबातील नेते व पदाधिकारी आता एकत्र एकाच रॅलीत न फिरता वेगवेगळे फिरून, रॅलीत सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहचण्याचा प्रय} करीत आहेत. काँग्रेसतर्फे आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा रघुवंशी हे वेगवेगळ्या भागात फिरून प्रचार करीत आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र मराठे, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे व इतर पदाधिकारी शहरातील इतर भागात मतदारांच्या गाठीभेटींवर भर देत आहेत. काँग्रेसची एकहाती कमांड अर्थातच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडेच आहे. भाजपतर्फे आमदार शिरिष चौधरी व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.रवींद्र चौधरी यांनी देखील वेगवेगळ्या भागात फिरून रॅलींमध्ये सहभाग घेतला. याशिवाय भाजपच्या जिल्हाध्यक्षा डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय गावीत आदी देखील सहभागी झाले होते. प्रभागांमध्ये लक्ष केंद्रीतप्रभागांमधील चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता त्या त्या पदाधिकारी, उमेदवारांना आपापल्या प्रभागात लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना नेते आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार संबधितांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अनेक उमेदवारांनी रविवारी जेवनावळी ठेवली होती. त्यात कॉलनी परिसरातील लोकांना स्नेहभोजन दिले होते. यावेळी आपली भावना आणि मत देण्याचे आवाहन देखील करण्यात आले. मते मागतांना आता खाली आणि वर दोन्ही ठिकाणी संबधीत चिन्हावरच मतदान करण्याचेही आवजरून सांगावे लागत आहे.