लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : यांत्रिकी शेतीचे महत्त्व वाढल्याने शेतीकामांमध्ये पारंपरिक साधनांचा वापर कमी होत आह़े यातून बैलांचा वापर अन् त्यांची खरेदीही कमी झाल्याचे गेल्या काही वर्षात सातत्याने समोर येत आह़े मात्र अक्कलकुवा येथे यात्रोत्सवात दरवर्षी भरणा:या बैल बाजाराने हा समज खोटा ठरवला असून येथे यंदा चार हजार बैलांची विक्री झाली आह़े गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुडय़ाचे प्रवेशद्वारे असा लौकिक असलेल्या अक्कलकुवा शहरालगत सोरापाडा गावात कालिका देवीचा यात्रोत्सव दरवर्षी मोठय़ा उत्साहात होतो़ यात पारंपरिक बैलबाजारही भरवण्यात येतो़ यंदाही येथे बैलबाजाराचे आयोजन बाजार समितीने केले होत़े या बैलबाजाराला अद्याप ग्लोबल असे स्वरूप नसतानाही केवळ अनेक वर्षाच्या तोंडी माहिती आधारे येथे दोन्ही राज्यातून शेतकरी व व्यापारी यांनी न चुकता हजेरी लावत चार हजार बैलांची खरेदी केली़ ठेलारी, नागोरी, गावठी आणि पंढरपुरी या प्रजातींच्या बैलांची याठिकाणी मोठय़ा प्रमाणात विक्री झाली होती़ यातही गावठी या सातपुडय़ातील बैल प्रजातीला सर्वाधिक मागणी होती़ प्रामुख्याने मराठवाडय़ातील शेतशिवारात सर्वाधिक कामास येणारा बैल असल्याने त्याची खरेदी होत़े बैल खरेदीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून आलेले सय्यद जुबेर मेहबूब यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, येथे 82 बैल खरेदी केले असून यांना गावाकडे शेतक:यांसाठी विकायला ठेवत असतो. 200 बैल खरेदीसाठी आलो होतो मात्र यंदा हवे तसे बैल मिळाले नसल्यामुळे परतावे लागत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातीलच शाकीर रमजानी सय्यद यांनी सांगितले की, 75 बैल खरेदी केले आहेत़ 4 महिने फक्त यात्रा करून सर्व ठिकाणांहून बैल विकत खरेदी करून मराठवाडय़ातील गावांमध्ये त्याची विक्री करतो़ हा पारंपरिक व्यवसाय पिढय़ांपासून करत आहोत़
अक्कलकुवा कालिका माता यात्रोत्सव : चार हजार बैलांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 12:29 PM