लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागासह परिसरातील एक किलोमिटरचा भाग हा सील करण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कातील १७ जणांचे स्वॅब घेण्यात येवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात असून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.तहसिलदार अक्कलकुवा तथा इंन्सीडेंट कमांडर विजयसिंग कच्छवे यांनी भाग क्रमांक दोन मधील कोंडवाडा गल्ली (पुर्वेकडील भाग) दर्गा रोड (फेमस चौकाजवळील भाग), हवालदार फळी (दक्षिणेकडील भाग) प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.उत्तरेकडील अनिस अहमंद फत्तेमहमंद यांच्या घरापासून उत्तरेकडील दगार्रोड परिसर, पश्चिमेकडील कोंडवाडा गल्लीतील पारस अशोकचंद सोलकी यांच्या घरापासून, दक्षिणेकडून फेमस चौक, पुर्वेकडील इंदिरानगर परिसर अशा प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या चतु:सिमा असतील.या परिसराच्या उत्तरेकडील दगार्रोड परिसर, केशव नगर,बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पश्चिमेकडील कोंडवाडा गल्ली, दक्षिणेकडील फेमस चौक परिसर, कुंभार गल्ली आणि पुर्वेकडील इंदिरा नगर परिसर हे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे.प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणाºया सर्वांची छाननी करावी.प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणाºया अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणाºया व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणाºया वाहनांचे निजंर्तुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, संसर्ग झालेली व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे. ही महिला यापूर्वी कुठून आली होती. येथे आल्यावर त्यांनी कुठे कुठे भेट दिली. कुणाकुणाशी संपर्क आला याची माहिती घेतली जात आहे.अक्कलकुवा शहरात तीनवेळा औषध फवारणी करण्यात आली आहे. परिसरातील प्रत्येक घरात वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात बॅरेकेडींग करण्यात आले आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात वाहनांना पुर्णत: बंदी करण्यात आली आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर चार व्यक्तींना पूर्वीच क्वॉरंटाईन करण्यात आले होते. प्राथमिक संपर्कातील १९ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येवून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू अथवा सेवा घरपोच देण्यात येणार असून त्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील नागरिकांनी उप अभियंता एस.आर.पवार (९४०४५६५६९३), सहायक अभियंता के.एम.राठोड (९२८४५०२९८४) किंवा तलाठी जी.डी.साखरे (९०२८९०५१०३)यांच्याशी संपर्क साधावा.
अक्कलकुवा केले चारही बाजूने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:26 PM