लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहाद्यातील प्रभाग क्रमांक सात मधील एक महिला व तिचा मुलगा असे दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या भागासह परिसरातील एक किलोमिटरचा भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. शहरात पुर्णत: लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. दरम्यान दोघा रूग्णांच्या संपर्कात आलेल्याचा शोध प्रशासनातर्फे घेतला जात असून आतापर्यंत त्याच्या कुटुंबातील १४ व इतर १० अशा २४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.शहादा उपविभागीय दंडाधिकारी चेतन गिरासे यांनी भाग क्र. सात मधील जनता चौक, बागवान गल्ली, इकबाल चौक, क्रांती चौक, पिंजार गल्ली, दातार चौक, गुजर गल्ली, मेन रोड, तुप बाजार, जवाई पुरा, भावसार गढी, सोनार गल्ली, साळी गल्ली, जुना प्रकाशा रोड, न. पा. दवाखाना हॉस्पीटल, गांधी नगर, भाजी मार्केट, बस स्टॉप परिसर, शास्त्री मार्केट, तुलसी मार्ग, अंबाजी मंदीर परिसर, हाजी इसहाक मेमन मिल कंपाऊंड परिसर, काका का ढाबा परिसर, आंबेडकर चौक, चांभारवाडा परिसर, पाणी टाकी चार रस्ता, नगरपालिका परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.या क्षेत्राच्या उत्तरेकडील बसस्थानकापासून ते चावडी चौकापर्यंत, पश्चिमेकडील चावडीचौकीपासून ते जुना प्रकाशा रस्त्यापर्यंत व तेथून न.पा. दवाखान्यापर्यंत, दक्षिणेकडून न. पा. दवाखान्यापासून ते व्हॉलंटरी शाळेलगत भाजी मार्केट पावेतो व पुर्वेकडील भाजीमार्केट पासून ते बसस्थानकापर्यंत अशा प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या चतु:सिमा असतील.या परिसराच्या उत्तरेकडील महावीर चौक, तकीया बाजार, टेक भिलाटी, गौसिया नगर, खेतिया रोड, मिरा नगर पाडळदा रोडपर्यंत भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पश्चिमेडील अमरधाम, लुम गल्ली, पिंगाणा पुल, आझाद चौक, सरदार पटेल चौक, कुकडेल, पटेल चौक, गुजर गल्ली, शिवाजी चौक, जुना प्रकाशा रोड, दक्षिणेकडील गांधीनगर, एच.डी.एफ.सी. बँक, विकास हायस्कुल परिसर, स्टेट बँक परिसर, स्वामी समर्थ मंदीर परिसर आणि पुर्वेकडील महालक्ष्मी नगर, नितीन नगर, पटेल रेन्सीडेन्सी रोड, सिद्धीविनायक मंदीर परिसर, कोर्ट परिसर, जुने तहसिल परिसरापर्यंतचे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे.प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणाºया सर्वांची छाननी करावी.प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणा?्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणाºया व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणाºया वाहनांचे निजंर्तुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.दोन्ही रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. संबधीत व्यक्ती हा केळी व्यापारी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याने केळी खरेदीसाठी कुठे कुठे भेटी दिल्या, कुणाशी संपर्क साधला याचा तपास करण्यात येत आहे. त्यावरून काहींना संस्थात्मक विलगीकरण तर काहींना घरातच विलगीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जे अगदी जवळून संपर्कात आले अशा २४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी नियोजन केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. वस्तू किंवा सेवा आवश्यक असल्यास मंडळ अधिकारी पी.बी.अमृतकर (९४२२२३८२५५) पालिकेचे चेतन गांगुर्डे (८२७५५६३९३९) किंवा पोलीस हवालदार जलाल शेख (९६३७५८७६२०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी गिरासे यांनी केले आहे.अन्यथा कारवाईलॉक डाऊन चे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रांत अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिला आहे. २१ एप्रिल च्या रात्रीपासून ते २४ एप्रिल च्या मध्यरात्रीपर्यंत शहरात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. या कालावधीत रुग्णालय मेडिकल वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात किराणा दुकान भाजीपाला दूध विक्रेते व पेट्रोल पंपाचाही समावेश आहे शासकीय कार्यालयात १० टक्के कर्मचाºयांची उपस्थिती असणार आहे.स्वयंसेवक नियुक्तकंटेनमेंट झोन परिसरात नागरिकांना अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू व औषधे सशुल्क विनासायास मिळण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ स्वयंसेवकांची तसेच आठ पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी आठ ते दहा व सायंकाळी पाच ते सात या कालावधीत कंटेनमेंट परिसरात हे स्वयंमसेवक औषधे व जीवनावश्यक वस्तू नागरिकांना मागणीनुसार पोहोच करतील नागरिकांची या स्वयंसेवकाची संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहेसंपर्क साधावाकंटेनमेंट परिसरातील नागरिकांनी आरोग्यविषयक काही तक्रारी असल्यास विशेष वैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आले आहे या पथकाशी संपर्क साधून नागरिकांनी माहिती द्यावी त्याचप्रमाणे शहादा चे मंडळ अधिकारी प्रमोद अमृतकर व पालिकेचे लिपीक चेतक गांगुर्डे यांच्या नियुक्तीचे आदेश अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिले.
शहादा व अक्कलकुव्यात अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:24 PM