लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : दुर्गम भागातील मोकस ता.अक्कलकुवा येथे सवा लाखाचा अवैध मद्यसाठा आढळून आला. हा मद्यसाठा मोलगी पोलीसांनी ताब्यात घेतला, परंतु आरोपी आढळून आला नाही. त्यामुळे पोलीसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.मोलगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांना मोकस ता.अक्कलकुवा या गावात अवैद्य मद्यसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार मोलगी पोलीसांनी मोकस येथे छापा टाकुन तपास केला असता राज्या बावा वसावे रा. यांच्या घराजवळ एका शेतातील माळ्यावर पशुधनाच्या वैरणीत अवैध मद्यसाठा लपवुन ठेवल्याचे आढळून आले. या मद्याची किंमत एकुण एक लाख २५ हजार २५० रुपये असल्याचे सांगण्यात आले. परंतु आरोपी आढळून आला नाही. या आरोपीच्या शोध घेण्यासाठी पोलीसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोहर पगार, हेड कॉस्टेबल रविंद्र कुवर, मेहरसिंग वळवी, दिपक वारुळे, बापु शेमले, पिंटु पावरा, अमोल शिरसाठ, मंगला पावरा यांच्या पथकाने केली.
मोकस येथे आढळला सव्वा लाखाचा अवैध मद्यसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 12:02 PM