लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 66 ग्रामपंचायतींत सरपंच आणि सदस्य पदासाठी दाखल 1 हजार 352 अर्जाची छाननी बुधवारी करण्यात आली़ यात नंदुरबार तालुक्यात सदस्य पदासाठी केवळ पाच अर्ज अवैध ठरल़े शहादा वगळता इतर तीन तालुक्यातील सर्व अर्ज वैध ठरले आहेत़ शहादा तालुक्यातील अर्जाची अंतिम आकडेवारी जाहिर होऊ शकलेली नाही़ दाखल अर्जापैकी 272 अर्ज लोकनियुक्त सरपंच तर 1 हजार 80 अर्ज सदस्यपदासाठी होत़े शहादा 32, नंदुरबार 23, नवापूर 5, तळोदा 4 तर अक्कलकुवा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आह़े यांतर्गत 11 सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती़ यात 1 हजार 352 अर्ज दाखल करण्यात आले होत़े अर्जाची छाननी बुधवारी करण्यात आली़ नंदुरबार तालुक्यात 23 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी दाखल 392 अर्जापैकी 5 अर्ज अवैध ठरवण्यात आल़े यामुळे येथे 387 अर्ज ग्राह्य धरले गेले आहेत़ सरपंच पदाचे 91 अर्ज दाखल होते हे सर्व अर्ज वैध ठरल़े तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे 1, जांभीपाडा 2, बोराळे 1 तर कलमाडी ग्रामपंचायतीत सदस्यपदासाठी दाखल असलेला 1 अर्ज अवैध ठरला़ जिल्ह्यात निवडणूक अधिसूचना लागू असलेल्या सर्वच 66 ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच लोकनियुक्त सरपंच निवडून येणार आह़े गावाचा पहिला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून येण्यासाठी चढाओढ आह़े यास्थितीतही ब:याच गावांमध्ये बिनविरोध सरपंच निवड होणे स्पष्ट झाले आह़े नंदुरबार तालुक्यातील भागसरी, नाशिंदे आणि सुजालपूर या गावांमध्ये सदस्य आणि सरपंच यांच्यासाठी जेवढय़ा जागा तेवढेच अर्ज प्राप्त झाले आहेत़ यामुळे येत्या छाननीनंतर ह्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्याचे जाहिर होणार होणार आह़े याचसोबत वावद येथे सरपंच निवड बिनविरोध होण्याची शक्यता आह़े येथे सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाला आह़े तसेच जांभीपाडा येथे सरपंच पदाची लढत थेट दोघांमध्ये होणार असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े नवापूर तालुक्यात सरपंच 25, सदस्य पदासाठी 67, तळोदा तालुक्यात सरपंच25 तर सदस्यपदासाठी 97 अर्ज आणि अक्कलकुवा तालुक्यात सरपंच पदासाठी 15 तर सदस्यपदासाठी 49 अर्ज दाखल हे होते हे सर्व अर्ज वैध असल्याचे निवडणूक विभागाने कळवले आह़े शहादा तालुक्याची आकडेवारी शुक्रवारी दुपारुन मिळण्याची शक्यता आह़े
नंदुरबार जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकीत सरपंच पदाचे सर्वच अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:29 PM