मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उमेदवारांच्या खर्चाचा पहिल्या टप्प्यातील आढावा निवडणूक आयोगाने घेतला. उमेदवारांनी बारीकसारीक तपशीलांसह खर्च देखील सादर केला आहे. आता दुसरा आणि तिस:या टप्प्यातील खर्चाचा आढावा त्या त्या तारखेला घेतला जाईल. जिल्ह्यातील चार मतदारसंघापैकी सर्वाधिक खर्च हा शहादा मतदारसंघातील भाजप उमेदवार राजेश पाडवी यांनी केला आहे. अर्थात पहिलाच टप्पा आणि प्रचार सभा आणि रॅलींची संख्या मर्यादीत असल्यामुळे हा खर्च सुरुवातीला अडीच लाखांच्या आतच दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराला खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये इतकी आहे. जो खर्च केला जातो त्याचा बारीकसारीक तपशील उमेदवाराला ठेवावा लागतो. त्यासाठी निवडणूक आयोगाने अर्जाचा विशिष्ट तक्ता दिलेला आहे. त्याद्वारेच तो खर्च सादर करावा लागतो. दैनंदिन खर्च सादर करण्याची कटकट न ठेवता अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विशिष्ट तीन तारखांनाच तो सादर करावा लागतो.जिल्ह्यातील चारही मतदार संघांसाठीच्या खर्चाचा आढावा दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला. अर्थात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते 10 तारखेर्पयतचा हा खर्च अहवाल होता.खर्च अहवाल सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरिक्षक अधिकारी यांनी तो मंजूर करणे आवश्यक आहे. त्यांना त्यात काही शंका आल्यास ते खर्चाचे विवरण परत पाठवू शकता. सुधारीत विवरण सादर करण्याची संधी त्यासाठी उमेदवाराला दिली जाते. नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदारसंघात पहिल्या टप्प्यात सादर झालेल्या खर्चाच्या अहवालांमध्ये कुणाहीबाबत शंका उपस्थित केली गेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात चारही मतदारसंघात एकुण 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात काँग्रेस, भाजप, शिवसेना, वंचीत बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, भारतीय ट्रायबल पार्टी, बसपा यासह इतर पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
यंदा कुणालाही नोटीस नाहीनिवडणुकीसंदर्भात खर्च सादर करण्यासंदर्भातील बैठकांना उपस्थित नसलेल्यांना नोटीसा वगैरे देण्यात आलेल्या नाहीत. समजून सांगण्यात आले. दुस:या आणि अंतिम खर्चाच्या अहवालावेळी मात्र निवडणूक निरिक्षक कडक धोरण अवलंबण्याची शक्यता आहे.
वाहनांवरील खर्च जादाउमेदवारांचा प्रामुख्याने वाहनावरील खर्च तूर्तास जादा असल्याचे निवडणूक खर्चाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी ज्यांनी रॅली काढली व हजारो कार्यकर्ते बोलविले त्यांना जास्तीच्या खर्चाच्या आकडय़ाला सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक उमेदवाराने किमान दोन ते जास्तीत जास्त दहा वाहने लावली असल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात आणखी वाहने वाढण्याची शक्यता आहे.
मतदारसंघ दोन तालुक्यांचे असल्याने दमछाक..जिल्ह्यातील चारही मतदारसंघ हे दोन तालुक्यांचे मिळून झाले आहेत. सर्वाधिक विस्तार असलेला अक्कलकुवा मतदारसंघ आहे. संपुर्ण अक्कलकुवा व धडगाव तालुक्याचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे प्रत्येक गावार्पयत पोहचण्यासाठी उमेदवारांची कसरत होत आहे. याशिवाय नंदुरबारही तसाच आहे.