शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या उद्या बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 11:36 AM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   मंगळवार, ८ रोजीच्या भारत बंदमध्ये जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सहभागी होणार आहेत. तसा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   मंगळवार, ८ रोजीच्या भारत बंदमध्ये जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सहभागी होणार आहेत. तसा निर्णय घेण्यात आला असून शेतकरऱ्यांनी देखील यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बंदला विविध संघटनांनी पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये व कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी पोलिसांनी देखील बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.   केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विषयक कायद्यांना विरोधसाठी दिल्ली येथे विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी विविध संघटना पुढे आल्या आहेत. त्याच अनुषंगाने मंगळवार, ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला पाठींबा वाढत      आहे. या काद्यात बाजार समितींच्या अस्तित्वाचा देखील प्रश्न आल्याने बाजार समितींनीही या आंदोलनाला पाठींबा देत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती बंद ठेऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्य संघाचे आवाहनराज्य संघाने याबाबत पत्रक काढून सर्व बाजार समितींना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे की,  महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांनी केंद्र शासनाने कृषि विषयक तीन कायदे पारित केलेले आहेत त्यास विरोध म्हणून विरोध देशातील विविध शेतकरी संघटना दिनांक ८  रोजी भारत देश बंद ठेवणार        आहेत. या बंद मध्ये सहभागी होण्याचा संघाने निर्णय घेतलेला असून   राज्यातील सव॔ कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून, शांततेच्या मार्गाने, कायदा सुविधा       भंग होणार नाही याची काळजी घेवून बंद मध्ये सहभागी व्हावे. सर्व       संचालक मंडळ, शेतकरी, आडते, खरेदीदार व हमाल बांधव सहकार्य करतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भारत बंद मध्ये हमाल मापाडी, माथाडी युनियन , राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे, राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे यांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्यामूळे बाजार समितीचे सर्व कामकाज बंद राहील. शेतीमाल आणू नयेबाजार समिती मंगळवारी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला कृषी माल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये असे आवाहन नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. बाजाराचा दिवसमंगळवार हा नंदुरबार व शहादा येथील बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल बाजार समितीत विक्रीस आणतात. आणलेला माल विक्री झाल्यानंतर बाजारात खरेदी करून ते पुन्हा गावी परत जातात. यावेळी मात्र बाजाराच्या दिवशीच बंद चे आयोजन करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे. विविध संघटनांचा सहभागमंगळवारच्या बंदमध्ये इतरही   विविध संघटना सहभागी होणार आहेत.   नर्मदा आंदोलन, लोकसंघर्ष मोर्चा यांच्यासह इतर संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला  आहे. 

   बंदोबस्ताचे नियोजन जिल्ह्यात बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी पोलिसांतर्फे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात नंदुरबार व शहादा या मोठ्या शहरांचा मंगळवारी आठवडे बाजार असतो. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण राहणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील सर्वच सहाही बाजार समित्या बंद राहणार असल्याने दैनंदिन व्यवहारावर परिणाम होणार आहे. नंदुरबार बाजार समिती गेल्याच महिन्यात चार दिवस बंद होती.