लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने सर्व अधिकारी व कर्मचा:यांच्या रजा रद्द केल्या आहेत. रविवार व सोमवारी सुटीच्या दिवशी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी पंचनाम्याचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी झालेल्या पावसाने अनेक भागात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. बचाव कार्य वेगाने केल्यानंतर मदत कायार्साठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे काम संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. पंचनामे पुर्ण करून मंगळवारी तालुकास्तरीय अधिका:यांनी कोषागारात देयके सादर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिका:यांनी दिले आहे. आपत्तीच्या परिस्थितीत अधिकारी-कर्मचा:यांसह अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्यात सहभाग घेतला आणि प्रशासनास सहकार्य केले. याबद्दल जिल्हा प्रशासनाने समाधान व्यक्त केले. पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी प्रशासन प्रय}शील असून नागरिकांनी परिस्थिती पुर्वपदावर आल्याशिवाय नदीकिनारी जाऊ नये. प्रवाहातून जाण्याचे धाडस करू नये. पाणी गाळून आणि उकळून प्यावे. घराजवळ पाणी साचू देऊ नये, असे आवाहन डॉ.भारूड यांनी केले आहे. जिल्ह्यातील रस्ते दुरूस्ती, वीज व दूरध्वनी सेवा, पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. मदत कार्यात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे. दरम्यान जिल्ह्यात नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. काही भागात नागरिकांना तात्काळ प्रशासनातर्फे मदतही देण्यात येत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे मुसळधार पावसामुळे सहा जनावरे दगावली होती. इतर जनावरांना संसर्ग होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पाड्यावरील सर्व जनावरांना घटसर्प आणि फ:या रोगाची लागण होऊ नये यासाठी लसीकरण करण्यात आले.
सर्व अधिकारी व कर्मचा:यांच्या सुटय़ा केल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:37 PM