लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उत्तर महाराष्ट्रातील तीन महिला खासदारांच्या उपस्थितीत झालेली भाजपच्या बैठकीत पक्ष संघटन वाढविणे, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला. राज्य सरकारचे विविध आघाडींवरील अपयश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनमानसात पोहचावे असेही आवाहन खासदारांनी केले. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खासदार डॅा. भारती पवार, पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता खासदार डॅा.हिना गावीत, खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिन्ही खासदारांनी पक्ष वाढीसाठी व संघटनासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. राज्य सरकार एक वर्षात विविध आघाडींवर सपशेल अपयशी ठरले आहे. जनमानसात नाराजीची भावना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सामान्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न ऐकुण घेत सोडवावे असे आवाहन त्यांनी केले. महिला सक्षमीकरणावर खासदार डॅा. भारती पवार, डॅा.हिना गावीत, रक्षा खडसे यांनी भर दिला. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात गेल्या वर्षभरात वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का? हा प्रश्न पडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाने महिला सक्षमीकरणावर भर देण्याचे ठरविले असून त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील महिला आघाडी देखील अधीक सक्षमपणे काम करावे. महिलांचे प्रश्न सोडवावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील पक्ष संघटन याचा आढावा घेतला. तिन्ही खासदार एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग असून तिघांची वेगवेगळ्या आघाडींवर निवड झाल्याने ती एक गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही खासदारांचा सत्कार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पक्षाचे महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
िल्ली येथे असल्यावर महिला खासदारांमध्ये खासदार डॅा.हिना गावीत, खासदार रक्षा खडसे, खासदार डॅा. भारती पवार, खासदार डॅा.प्रितम मुंडे या एकत्रच राहतात. त्यांच्या मैत्रीची चर्चा दिल्लीतही असते. आज यापैकी तीन मैत्रीणी नंदुरबारात एकत्र आल्या. त्यामुळे त्यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. आपल्या भाषणात देखील त्यांनी दिल्लीतील काही अनुभव सांगितले. पुढील वेळी खासदार डॅा.प्रितम मुंडे यांनाही आणून मैत्रीणींचे वर्तूळ पुर्ण केली जाईल अशी अपेक्षा विजय चौधरी यांनी व्यक्त केली.