लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुनर्वसन झालेल्या प्रकल्प बाधितांना त्यांच्या आवडी-निवडीनुसार जमिन वाटप करण्याची तरतुद शासनामार्फत करण्यात आली होती. परंतु काथर्देदिगर येथील येथील सहा बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासकीय यंत्रणेने परस्पर खराब जमिनी त्यांच्या नावावर केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहे.सरदार सरोवर प्रकल्पाच्या विकसासाठी नर्मदा नदी काठावरील गावांची अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालक्यांमध्ये पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील डनेल, मुखडी या भागातील बांधवांचे शहादा तालुक्यातील तºहावद येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे पुन्हा जागा कमी पडत असल्यामुळे बहुतांश कुटुंबांचे काथर्देदिगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यात प्रथम ८१ कुटुंबांचे पूनर्वसन झाले त्यानंतर टप्प्या-टप्प्याने ४० व २७ असे एकुण १४८ कुटुंबांचा तेथे समावेश करण्यात आला आहे. पूनर्वसित गावांमध्ये अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे शासनामार्फत सांगण्यात आले होते. परंतु काही सुविधा वगळता बहुतांश सुविधा शासनामार्फत उपलब्ध करुन दिल्या नसल्याने काथर्देदिगर ता.शहादा येथील विस्थापितांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नर्मदा नदीकाठावर मोठ्या जंगलामुळे उदरनिर्वाहासाठी विविध माध्यमातून नागरिकांना भांडवल उपलब्ध होत होते. परंतु पूनर्वसित गावांमध्ये विस्थापित बांधवांना केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. उदरनिर्वाह व जीवनाचा आधार मिळविण्यासाठी विस्थापितांची धावपळ होत आहे. नर्मदा नदीकाठावर उपलब्ध होणाºया भांडवलासारखे भांडवल काथर्देदिगर येथेही उपलब्ध व्हावे, या अपेक्षेनेच डनेल, मुखडी व अन्य गावांमधील बाधित काथर्देदिगर येथे स्थायिक झालेया बाधितांना त्यांच्या आवडी-नवडी विचारात घेत व त्यांनी होकार दिल्यानंतरच जमिन त्यांच्या नावावर करण्यात याव्या, अशा तरतुदी देखील शासनामार्फत करण्यात आल्या होत्या. परंतु काथर्देदिगर ता.शहादा येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या सहा बाधितांना विश्वासात न घेता शासन यंत्रणेमार्फत त्यांच्या नावावर जमिनी करुन दिल्या आहे. त्यांना काहीही न विचारता नावावर करण्यात आलेल्या जमिनी वेगवेगळ्या कारणांनी खराब निघाल्याचे बाधितांमार्फत सांगण्यात आले आहे.या जमिनी रद्द करीत सहाही शेतकऱ्यांना नवीन जमिनी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करुनही बाधितांच्या समस्येशी दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. मागºया प्रस्तावित असल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे काथर्देदिगर येथील अन्यायग्रस्त नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे.तक्रार करणाºया शेतकºयांना काहीही न विचारता जमिनी नावावर करण्यात आलेल्या जमिनी प्रत्याक्षात उत्पादन क्षमता कमी असल्याचे आढळलन आल्या. तर काही जमिनींची प्रत खालावलेली असल्याचे देखील या बाधित शेतकºयांमार्फत सांगण्यात येत असून त्यांना कसदार जमिनीची प्रतिक्षा लागली आहे.
पुनर्वसितांना विश्वासात न घेता जमिनी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:13 PM