लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : यावर्षी संपलेल्या ऊस गाळप हंगामाच्या मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसासाठी लॉकडाऊनमुळे अदा न झालेली एक कोटी ८० लाख रुपयांची रक्कम आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून बुधवारी अदा करण्यात आली.आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम १२ मार्च २०२० रोजी पूर्ण झाला. गळीत हंगामात एक लाख २४ हजार १४६ मेट्रीक टन उसाचे गाळप झाले व ९.७५ टक्के साखर उतारासह एक लाख २० हजार ३५२ क्विंटल साखर उत्पादित झाली. यापैकी एक लाख १४ हजार ७४१ मेट्रीक टन उसाची दोन हजार ३०१ रुपये एकरकमी दराने २६ कोटी ४० लाख १९ हजार रुपये रक्कम २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. १ मार्च ते १२ मार्च २०२० पर्यंत नऊ हजार ४०५ मेट्रीक टन गाळप झालेल्या उसाची एक कोटी ८० लाख ४६ हजार ६०० रुपये मात्र देणे बाकी होते. त्याचे पेमेंटचे हिशेब करण्याआधी जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून सुरु झाला. त्यामुुळे सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यातही २२ मार्च २०२० ते १८ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढत गेला. त्यामुळे शासनाचे सर्व कार्यालय व बँकेची कार्यालये बंद झाली. कारखान्याचे कार्यालयेही सोशल डिस्टन्सिंगमुळे ३१ मे २०२० पर्यंत बंद होते. कारखान्याचे मुख्य अधिकारी धुळे व नाशिक जिल्ह्यातील असल्याने व जिल्हाबंदी झाल्याने ते कारखान्यात कामावर येऊ शकले नाहीत. ऊस पेमेंटसाठीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेतून उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या उपरातही कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या ३२ लाख रुपये रक्कमेतून काही शेतकºयांना कारखान्याने त्यांच्या अडचणी लक्षात घेता ५० टक्के रक्कम चेकने अदा केली. कारखान्याकडून दर पंधरवड्यात १ ते १५ व १६ ते ३० मध्ये गाळप ऊस बिलाचा हिशेब करुन त्याची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे १ मार्च ते १२ मार्च २०२० पर्यंत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट थकले. ही उर्वरीत रक्कम १५ जुलै २०२० पर्यंत सर्व शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे कारखान्याने शेतकºयांना आश्वासन दिले होते. त्यानुसार १५ जुलै २०२० पर्यंत उर्वरित शेतकºयांचे ऊस पेमेंट संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात बुधवारी जमा करण्यात आले असून शेतकºयांनी बँकेशी संपर्क साधून ऊस बिलाची रक्कम जमा झाल्याची खात्री करुन घ्यावी, असे चेअरमन आमदार शिरीष नाईक यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील काही सहकारी साखर कारखान्यांचे अद्यापपर्यंत आधारभूत जाहीर दरानुसार पेमेंट देणे बाकी असताना आदिवासी सहकारी साखर कारखान्याने शासनाच्या जाहीर आधारभूत दरानुसार एकरकमी प्रती मेट्रीक टन दोन हजार ३०१ रुपयेप्रमाणे अदा केले असून कोणत्याही शेतकºयाचे ऊस पेमेंट बाकी नाही, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार शिरीष नाईक व कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
ऊस उत्पादकांना पावणेदोन कोटींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:53 AM