तळोदा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात विधी सेवा महाशिबिर घेण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण योजना संलगA विविध शासकीय योजनांची लाभाथ्र्याना माहिती व लाभ जागीच देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महाशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे यांनी केले.शिबिरास जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश मेढे, आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, तळोदा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. मोरे, वकील संघाचे सचिव अॅड.चंद्रकांत आगळे, अॅड.सचिन राणे, प्रभारी तहसीलदार रामजी राठोड, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे आदी उपस्थित होते.याप्रसंगी न्यायमूर्ती बोर्डे म्हणाले की, शासनाच्या सर्व सामान्यांसाठी अनेक योजना आहेत. पण त्या योजनांची माहितीच लोकांना मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा निधी खर्च होत नाही व तो परत जातो. आदिवासी पाडय़ावर शेवटच्या ठिकाणी राहणारा जो गरीब माणूस आहे त्याच्या र्पयत ही माहिती पोहोचली पाहिजे. प्रशासनाच्या बरोबर राहुन त्यांच्या सहकार्याने हे काम आम्हाला करायचे आहे. पाडय़ावरच्या शेवटच्या आदिवासी माणसार्पयत पोहोचून काम केले पाहिजे. त्या माणसाच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. प्रशासनाच्या बरोबर राहून लोकांना मदत करायची आहे. पाडय़ावरच्या आदिवासी भागातील शेवटच्या माणसाच्या चेह:यावर फुललेल हास्य पहाण हा या महाशिबिराचा उद्देश आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने सर्व सामान्य लोकांर्पयत शासनाच्या विविध योजना त्यांचे लाभ योग्य व गरजू लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी प्रशासनाबरोबर न्यायालयाने सहभाग घेवून काम करण्याची ही संकल्पना असून, हे महाशिबिर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या गावात होत असल्याने शिबिराचे एक आगळे वेगळे महत्व असल्याचे न्याय.बोर्डे यांनी सांगितले. तसेच कायदेविषयक विधी सेवा प्राधिकरणाच्या माहिती पुस्तिकेची प्रकाशन करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले की, लाभाथ्र्याना सर्व योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. आभार जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश अभय एस.वाघवसे यांनी मानले.कार्यक्रमास राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निखीलकुमार तुरखिया, वतनकुमार मगरे, औरंगाबादचे सरकारी वकील अमरसिंग गिरासे, नंदुरबार जिल्हा सरकारी वकील सुशिल पंडित, अॅड.चंद्रशेखर पवार, अॅड.किरण बैसाणे, अॅड.शैलेष कापुरे, अॅड.संजय पुराणीक, अॅड.महेबुब मन्सुरी, अॅड.एन.एस. शेख, अॅड.इम्रान पिंजारी, अॅड.महेबुब मन्सुरी, तालुका गट वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्रकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, यादव भदाणे यांच्यासह पोलीस, महसूल, पालिका, कृषी, वन विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य व इतर विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तळोदा येथील महाराजस्व अभियानात साडेपाच हजार दाखल्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:47 PM