लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्यअभियानांतर्गत जननी शिशू सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गरोदर महिलांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी शासनातर्फे रुग्णवाहिका सुरू करण्यातआल्या आहेत. मात्र ही सेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील गरोदर मातांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचीमागणी करण्यात येत आहे.गरोदर महिलांना रुग्णालयात तातडीने पोहोचता यावे याकरीता शासनाने 102 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली आहे. त्यानुसार 102 याक्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर गरोदर मातेचे पूर्ण नाव, गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हा याबाबत सविस्तर माहिती विचारण्यातयेते. त्यानंतर रुग्णवाहिका चालकांशी संपर्क साधून त्या-त्या ठिकाणी रुग्णवाहिका पाठविण्यात येते. परंतु ही सेवा ग्रामीण भागात विस्कळीत झाल्याने दुर्गम अतिदुर्गमभागातील नागरिकांचा रुग्णवाहिकेच्या चालकांशी संपर्क होऊ शकत नाही. मात्र 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधल्यास रुग्णवाहिका डॉक्टरांसमवेतसंबंधित ठिकाणी दाखल होते.102 क्रमांकाची रुग्णवाहिका ही अतिदुर्गम भागासाठी असूनदेखील या रुग्णवाहिकेच्या चालकांशी संपर्क होतनसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच संपर्क झाल्यास संबंधित रुग्णवाहिका चालक मनमानी करीत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकारामुळेगरोदर महिलांचे हाल होत असतात. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे.जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातेसाठी घरापासून तेदवाखान्यार्पयत ये-जा करण्याकरीता व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर गरोदर महिलेवर विविध चाचण्या व औषधोपचार मोफत केला जातो. परंतु आरोग्य कर्मचा:यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहे
रुग्णवाहिका सेवा विस्कळीत झाल्याने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 11:12 AM