लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकअदालतीत ४४० प्रकरणांमध्ये एक कोटी ७९ लाख ७५ हजार ८५७ रुपयांची रक्कम तडजोडीअंती देण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय दाखलपूर्व प्रकरणांमध्ये देखील १६ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली.नंदुरबार जिल्हा न्यायलायात जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे राष्टÑीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी चार पॅनेल तयार करण्यात आले होते. दिवसभरात दाखलपूर्व सहा हजार ४५६ प्रकरणे होती. त्यापैकी ३३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात एकुण १६ लाख ४१ हजार २४० रुपयांच्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. यात बँक वसुलीचे एक हजार ४७८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी १७ निकाली काढण्यात आली. त्यातून नऊ लाख ५२ हजार ८०० रुपयांची तडजोड रक्कम मंजुर करण्यात आली. वीज बिलासंदर्भातील एक हजार ३१५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ८६ हजार ३९ रुपयांची तडजोड रक्कम देण्याचे तर पाणीपट्टीचे दोन हजार ९५९ दाखलपूर्व प्रकरणांपैकी ३०३ प्रकरणे तडजोड करून सहा लाख दोन हजार ४०१ रुपयांची रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले.दाखल प्रकरणांमध्ये फौजदारी ३८ खटल्यांपैकी २६ निकाली काढण्यात आले. त्यातील एक हजार ७२४ रुपयांची रक्कम तडजोडीअंती मंजुर झाली. धनादेश अनादरचे २५८ खटले ठेवण्यात आले होते. पैकी ३९ निकाली काढण्यात आले. ४९ लाख २४ हजार ६९ रुपयांची तडजोड रक्कम मंजुर झाली. मोटर अपघाताचे ८१ खटले ठेवण्यात आले होते. पैकी २६ निकाली निघून तडजोडीअंती एक कोटी १४ लाख दोन हजार ८२४ रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली. एकुण ६०१ दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी १०३ निकाली निघून एक कोटी ६३ लाख २८ हजार ६१७ रुपयांची तडजोड रक्कम मंजुर करण्यात आली.यावेळी चार पॅनेल तयार करण्यात आले होते. पहिल्या पॅनेलचे प्रमुख जिल्हा न्यायाधिश आर.एस.गुप्ता होते. तर पी.बी.चौधरी, पुष्पेंद्र पाटील, मोहन घुगे, व्ही.एस.पाडवी, के.बी.वाडीले, सुहास जोशी यांचा समावेश होता. दोन नंबरच्या पॅनेलचे प्रमुख न्या.एल.डी.गायकवाड होते. चिंतामणी सोनार, ए.बी.पाटील, एन.आर.पाटील, रेखा वळवी, गोपाल पाटील, आर.एस.सोनवणे, फारूख शेख यांचा त्यात समावेश होता. तीन क्रमांकाच्या पॅनेलमध्ये न्या.जी.एच.पाटील पॅनेल प्रमुख होते. उमा चौधरी, एन.डी.चौधरी, दिपक चौधरी, जे.व्ही.बागड, पमन जाधव यांचा त्यात समावेश होता. चौथ्या क्रमांकाच्या पॅनेलचे प्रमुख न्या. जे.सी.गुप्ता होत्या. सदस्यांमध्ये डी.डी.पाटील, एन.एल.गिरासे, गोविंद भामरे, संदीप पाटील, वसीम अन्सारी यांचा त्यात समावेश होता.
एक कोटी ७९ लाख रुपयांची रक्कम तडजोडीअंती मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:31 AM