शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

हक्काच्या घराचा आनंद गगनात मावेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 11:52 AM

नंदुरबार : पालिकेने आयएसएचडीपी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर केलेल्या घरकुलांचे प्रत्यक्षात वाटप केल्यानंतर लाभार्थीसह त्यांच्या कुटूंबियांच्या चेह:यांवरचा आनंद ...

नंदुरबार : पालिकेने आयएसएचडीपी आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर केलेल्या घरकुलांचे प्रत्यक्षात वाटप केल्यानंतर लाभार्थीसह त्यांच्या कुटूंबियांच्या चेह:यांवरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता़ या आनंदाने कधी हास्य तर कधी अश्रुंना वाट मोकळी होत असल्याने वातावरण भारावले होत़े मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहाच्या आवारातील डोममध्ये लाभार्थीना प्रमाणपत्र वाटप आणि घरकुल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल़े अध्यक्षस्थानी आमदार अॅड़ क़ेसी पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या संगिता गावीत, उपनगराध्यक्ष परवेज खान, पाणीपुरवठा समिती सभापती कैलास मराठे, बांधकाम सभापती कुणाल वसावे, जागृती सोनार, मनिषा वळवी, सोनिया राजपूत, शारदा ढंढोरे, फहमिदाबानो कुरेशी, यशवर्धन रघुवंशी, शहादा बाजार समिती संचालक रविंद्र राऊळ आदी उपस्थित होत़े प्रारंभी उपनगराध्यक्ष परवेजखान यांनी घरकुल प्रकल्पाची माहिती दिली़ यानंतर मान्यवरांचे तसेच घरकुलांचे काम पूर्ण करणारे पंकज बिर्ला यांचे स्वागत करण्यात आल़े कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी घरकुलांचे आजचे वाटप म्हणजे गोरगरीब जनतेची दिवाळी आह़े  आमदार चंद्रकांत रघुवंशी हे घरकुल प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होत़े  त्यांच्या परिश्रमातून हे स्वपA साकार झाल्याचे सांगितल़े कार्यक्रमात नगराध्यक्षा रघुवंशी यांनी नंदुरबार शहरातील शासकीय व निमशासकीय जमिनींच्या आरक्षणाची पडताळणी करुन ते मुक्त करण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडणार आहोत, यातून शहर अतिक्रमणमुक्त होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितल़े  कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चेन्नई येथून मोबाईलद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केल़े  गरीबांना घरे देण्याचा आनंद आह़े घरकुलाच्या कामाला आणि वाटपाच्या प्रक्रियेला विरोध करणे योग्य नाही, घरकुल मिळालेले नसलेल्यांनाही घरकुल देण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े त्यांचे कागदपत्रे तपासण्यात येतील़ अद्याप 230 घरकुलांचे वाटप शिल्लक असून अर्ज मागणवणार आह़े यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु करु, घरकुलाचा लाभ घेणा:यांनी जातीय सलोखा कायम ठेवल्यास शांतता टिकून राहील असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितल़े  दिपक पाटील यांनी पालिकेच्या कामाचे कौतूक करत कार्यक्रमाला विरोध करणा:यांना धडा शिकवला पाहिजे असे सांगितल़े आमदार पाडवी यांनी नंदुरबार पालिकेच्या कामाचे कौतूक करत सर्व समुदायाच्या नागरिकांनी सलोख्याने राहून स्मार्ट नंदुरबारची संकल्पना जोपासली पाहिजे असे सांगितल़े2012 नंदुरबार शहरातील भोणे फाटा आणि सिव्हील हॉस्पिटल परिसरातील घरकुलांच्या लाभार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल़े सोडत काढण्यात आलेल्या 636 लाभार्थीना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल़े एकूण 21 कोटी 58 लाख रुपये खर्चाच्या या योजनेतील लाभार्थीना प्रत्येकी 2 लाख रुपयांत घर देण्यात आले आह़े प्रारंभी प्रतिनिधिक स्वरुपात निवडक 30 महिलांना मान्यवरांनी प्रमाणपत्रांचे वाटप केल़े या सर्वप्रथम घरकुल मिळण्याचा मान लक्कडकोट परिसरात राहणा:या साबिराबी शेख यांना देण्यात आला़ कार्यक्रमात मंचावर येणे शक्य नसलेल्या एका वृद्ध लाभार्थी महिलेला आमदार पाडवी यांनी खाली उतरुन प्रमाणपत्राचे वाटप केले