नंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे धरले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.सकाळी धरणे आंदोलन केल्यानंतर दुपारी मुख्य कार्यकारी अधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचा:यांच्या भरतीवरील र्निबध तातडीने उठवावेत आणि अल्प उपस्थितीच्या अंगणवाडय़ांचे एकत्रीकरण करू नये. कर्मचारी कपातही करू नये. कर्मचा:यांना पुर्णवेळ काम देवून शासकीय, निमशासकीय कर्मचा:यांचा दर्जा द्यावा. सेवासमाप्ती लाभामध्ये सुधारणा करावी. भाऊबिज भेटीच्या रक्कमेमध्ये वाढ करावी. दरवर्षी मानधनात 20 टक्के वाढ करावी. सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर वारसदारांना सामावून घ्यावे. केंद्र स्तरावर मिळणारा परिवर्तनीय निधी व गणवेशाच्या रक्कमेत वाढ करावी. इतर महिला कर्मचा:यांप्रमाणे अंगणवाडी कर्मचा:यांना बालसंगोपनाची रजा लागू करावी यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, राजू पाटील, नयना मराठे, लता गावीत, प्रतिभा पाटील, यमुना पाटील, मोहिनी पाटील आदी सहभागी झाले.
अंगणवाडी कर्मचा:यांचे मागण्यांसाठी नंदुरबारात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:41 PM