लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : स्त्रीयांच्या व मुलींच्या अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली शहादा येथील पुंडलिक गोरख मराठे यांस शहादा पोलिसांनी शुक्रवारी अटक करुन नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मराठे यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, 10 जानेवारी 2017 रोजी पुणे येथील रेस्क्यु फाउंडेशन व शहादा पोलिसांनी शहरातील भाजी मंडई मागील रेड लाईट एरियावर छापा टाकून 69 महिला व मुलींना ताब्यात घेतले होत़े यात अनेक मुली अल्पवयीन असल्याने तीन महिलांविरोधात स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल झाला होता़ दरम्यान, पिटा व पोस्को कायद्यान्वये दाखल या गुन्ह्यांसदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात मुलींच्या पालकांसह विविध संघटनांनी 17 याचिका दाखल केल्या होत्या़ या घटनेतील अल्पवयीन मुली या निमच (मध्य प्रदेश) व बुंदी (राजस्थान) येथील असल्याने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होत़े दरम्यान, रेस्क्यु फाउंडेशनच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सर्व याचिकांची सुनावणी एकत्रितपणे घेण्याची याचिका दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिपत्याखाली स्पेशल एसआयटी गठीत करण्यात येवून या गुन्ह्यात सहभागी असणा:यांवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले होत़े त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी महारु पाटील यांनी आज चौकशी दरम्यान पुंडलीक गोरख मराठे (45) रा़ रामनगर शहादा यास अटक करुन जिल्हा न्यायाधिश अभय वाघवसे यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ याच गुन्ह्यात हेमा शामलाल सिंह, वैशाली रमेश पवार व मायाबाई महेश पटेल या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती़ तर महिला व अल्पवयीन मुलींना मध्यप्रदेश, राजस्थान व राज्यातील इतर भागातून येथे आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणा:या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़
पिटा व पोस्कोअंतर्गत शहाद्यात आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:41 PM