लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन दिवसात दोन बाधीत व एक संशयीतासह तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. दुसरीकडे चार पाच ते सहा दिवसांपूर्वी पाठविलेल्या स्वॅबचे अहवालही येत नसल्यामुळे संशयीतांची चलबिचलता वाढली आहे. जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांचेही नियमित स्वॅब घेण्याचे बंद झाल्याने कर्मचारीही नाराजी व्यक्त करीत आहे.कोरोनामुळे मृत्यूंची संख्या कमी होती. डेथ रेट कमी असल्यामुळे समाधानही व्यक्त करण्यात येत होते. परंतु गेल्या दोन दिवसात झालेले मृत्यू व ते देखील कमी वयोगटातील बाधीतांच्या मृत्यूमुळे सहाजिकच चिंता वाढली आहे.कमी वयोगटातील मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे झालेले चार मृत्यू हे ६० वर्ष वयोगटाच्या पुढील व्यक्तींचे होते. तर एक तरुण व एक ५० च्या वयोगटातील होता. आता दोन मृत्यू हे देखील ५० वयोगटातील आहेत. ४५ वर्षीय महिला आणि ४७ वर्षीय पुरुषाचा त्यात समावेश आहे. तिसरा संशयीत मृत्यू झाला आहे त्या वृद्धेचा वयोगट ७० च्या पुढे आहे. या वृद्धेचा स्वॅब रिपोर्ट येण्याचा बाकी आहे.मृत्यू वाढले, दर कमी झालाजिल्ह्यातील मृत्यूदर हा सुरुवातीपासूनच अस्थिर राहिला आहे. कमी रुग्ण संख्या होती त्यावेळी हा दर नऊ टक्केपर्यंत होता. नंतर रुग्ण संख्या वाढल्याने हा दर कमी झाला. सध्या १६३ कोरोना बाधीत असतांना मृत्यू संख्या आठ झाली. तरीही मृत्यूदर हा ४.९० टक्के इतका आहे. मृत्यूदर हा सतत अस्थिर राहत आहे.स्वॅब घेण्याचे बंदसलग चौथ्या दिवशी नंदुरबारात एकही स्वॅब घेतला गेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या संपर्कातील आणि क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या लोकांची घालमेल वाढली आहे.कोविड तपासणीच्या धुळ्यातील लॅबमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने तेथील स्वॅब तपासणी मंदावली आहे. नंदुरबारहून स्वॅब पाठवू नये अशा सुचना रविवारीच जिल्हा रुग्णालयाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सोमवारपासून जिल्हा रुग्णालयात एकही स्वॅब घेतला गेला नाही. तीन दिवसांपासून स्वॅबची संख्या निरंक राहत आहे. शिवाय अहवाल देखील सोमवारपासून मिळालेले नाहीत.गेल्या आठवड्यात आढळलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब देखील घेतले गेले नाहीत. ज्यांचे घेतले गेले त्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत. त्यामुळे अशा लोकांची घालमेल वाढली आहे.गुरुवारी होळ शिवारातील विमल हौसिंग सोसायटी येथील क्वॉरंटाईन केंद्रातील लोकांनी संताप व्यक्त करीत तातडीने स्वॅब घ्यावा किंवा स्वॅबचे रिपोर्ट तातडीने मिळावे अशी मागणी केली.सद्य स्थितीत जिल्ह्यातील क्वॉरंटाईन केंद्रांमध्ये जवळपास १२० पेक्षा अधीक जण क्वॉरंटाईन झाले आहेत. त्यांच्यापैकी ९० टक्के जणांचे स्वॅब घेतले गेले नाहीत. त्यामुळे क्वॉरंटाईन झालेले लोकं स्वॅब घेण्यासाठी आरोग्य कर्मचाºयांमागे तगादा लावत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे देखील स्वॅब घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचलता दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात नियुक्तीला असलेल्या कर्मचाºयांचे सहा दिवसांची ड्युटी संपल्यानंतर लागलीच त्यांची कोरोनाची टेस्ट केली जाते. परंतु चार दिवसांपासून कुणाचेही स्वॅब घेतले जात नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या कर्मचाºयांसह इतर भागातील रुग्णांच्या संपर्कातील आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असलेल्यांचेही स्वॅब घेतले जात नसल्याची स्थिती आहे.