शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

नंदुरबारच्या युवकाने तयार केले कोरोनाची लक्षणे सांगणारे अ‍ॅप व कीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इंजिनियर असलेल्या युवकाने लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा सदुपयोग करत कोरोनाची लक्षणे शोधून माहिती देणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील इंजिनियर असलेल्या युवकाने लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा सदुपयोग करत कोरोनाची लक्षणे शोधून माहिती देणारे मोबाईल अ‍ॅप आणि कीट तयार केले आहे़ अत्यल्प खर्चात तयार केलेले कीट आणि अ‍ॅप शरीरातील आॅक्सिजन व इतर घटकांची मात्रा सांगून कोरोनाचा अलर्ट देणार आहे़योगेश अहिरे या उद्यमी युवकाने हे अ‍ॅप आणि कीट डेव्हलप केले असून मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या योगेश याने शहरात स्टार्ट अप अंतर्गत पहिला बीपीओही सुरू केला आहे़ यांतर्गत अनेकांना रोजगार मिळवून दिला असताना ग्रामीण भागातील युवकांना आॅनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या मोबाईलच्या डेव्हलपिंग तो काम करत आहे़ दरम्यान मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर योगेश अहिरे याने कोरोनाची लक्षणे सोप्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी समोर येतील यासाठी एखादे अ‍ॅप डेव्हलप करण्याचे निश्चित केले होते़ त्यावर करत असताना त्याला आयएम हेल्दी हे अ‍ॅप आणि कीटची संकल्पना सुचली़ आॅक्सिमिटर आणि फिव्हर यांची माहिती देणाºया दोन यंत्रांचे एकत्रित मॉडेल तयार करुन त्याची माहिती वापरकर्त्याच्या मोबाईलवर देण्याचा अनोखा प्रयोग त्याने यशस्वी करत हे कीट बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ आॅगस्ट महिन्यात हे कीट बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती योगेश याने पत्रकार परिषदेत दिली आहे़यावेळी त्याने सांगितले की, या कीटच्या बनावटीचा कारखाना नंदुरबारात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे़ अल्प खर्चात तयार केलेल्या कीटमध्ये ५ व्होल्टचे चार्जर, दोन बॅटरी लावण्यात आली असून युव्ही लाईट चीपमुळे एकाने थंब केल्यावर त्याला सॅनेटाईज करण्याची गरज भासणार नाही़ एखाद्याकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्यास अ‍ॅडमिन असलेल्या व्यक्तीच्या मोबाईमध्ये शरीरातील विविध रिडिंग्स देण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे़बायोमेट्रिक थंब मशिनप्रमाणेच असलेल्या या कीटमधील मशिनवर बोट ठेवल्यानंतर शरीरातील ताप, रक्तदाब, आॅक्सिजनचे प्रमाण याची माहिती मिळणार आहे़ ही माहिती मोबाईलमध्ये संकलित होवून ती आरोग्य विभाग किंवा फॅमिली डॉक्टरपर्यंतही पोहोचणार आहे़या डेमो मॉडेलचे सादरीकरण योगेश अहिरे याने जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले होते़तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपचे कॉपीराईट तर कीटला आयसीएमआर या संस्थेने नॉर्मल मेडिकल डिव्हाईस म्हणून मान्यता आहे़ आॅक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंगप्रमाणेच हे काम करणार आहे़ शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय यासह गर्दीच्या ठिकाणी हे कीट व अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे़