लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 51 ग्रामपंचायतींच्या 185 प्रभागात 504 सदस्यपदांसाठी बुधवार्पयत 208 तर सरपंच पदासाठी 27 नामनिर्देशन दाखल झाले आहेत़ सलग चार दिवस पितृपक्षामुळे निर्माण झालेली कोंडी फुटल्यानंतर बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता़ गुरूवारी सुटी असल्याचे जाहिर झाल्याने गर्दी झाली होती़ याचदरम्यान गुरूवारी सुटी जाहिर असतानाही उमेदवारांची नामनिर्देशन दाखल करण्यात आल़े यातही केवळ नंदुरबार तालुक्यातील ग्रा़पंसाठी 23 अर्ज दाखल झाल़े निवडणूक आयोगाने नामनिर्देशन दाखल करण्यासाठी गुरूवारी अचानक सुटी रद्द करण्याच्या सूचना काढल्या होत्या़ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोगाकडून ही माहिती देण्यात आली़ मात्र ही माहिती उमेदवारांर्पयत न पोहोचल्याने कामाचा दिवस असूनही इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकलेले नाहीत़ आयोगाने अचानक काढलेल्या या आदेशांची माहिती उशिराने मिळाल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली़ सुटीची माहिती असल्याने अद्याप निम्म्यापेक्षा अधिक अर्ज दाखल होणे, क्रमप्राप्त असल्याने शुक्रवारी प्रशासनाचा कस लागणार आह़े विशेष म्हणजे अनेक इच्छुक ऑनलाईन नामनिर्देशन दाखल करण्यासाठी शहरी भागात हजर होत़े त्यांना निवडणूक कक्ष बंद झाल्यानंतर सुटीची सुचना मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली गेली़ अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयातील निवडणूक कक्ष गुरूवारी दिवसभर बंद होता़ आयोगाने आदेश काढूनही तेथील निवडणूक निर्णय अधिकारी कामावर परत न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े दुपारी तीन वाजेर्पयत याठिकाणी काहींनी भेटी दिल्या होत्या़ सुटी रद्द झाल्याचे आदेश देऊनही अधिकारीच न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े या कक्षाला दिवसभर कुलूप होत़े दुसरीकडे अक्कलकुवा शहरातील ऑनलाइन नामनिर्देशन भरणा होणा:या तीनही केंद्रांवर गर्दी होती़ तालुक्याच्या विविध भागातून आलेले इच्छुक उमेदवार व त्यांचे पाठीराखे हे याठिकाणी थांबून होत़े सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आयोगाचे पंचायत इलेक्शन हे संकेतस्थळ बंद पडत होत़े गेल्या दोन दिवसात अक्कलकुवा शहरातील सर्व तीन अधिकृत केंद्र व सायबर कॅफेवर नामनिर्देशन दाखल करणारे रात्री उशिरार्पयत थांबून होत़े आता केवळ एक दिवस शिल्लक असल्याने या केंद्रावर पुन्हा गर्दी वाढणार असल्याचे संकेत आहेत़
निवडणूक कक्षांमध्ये सुटीच्या दिवशी स्विकारले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:38 AM