शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

एकाच वेळी 10 ते 12 जणांचे नियुक्ती आदेश : बोगस शिक्षकांची नियुक्ती प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:07 PM

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : बोगस शिक्षक भरती करणा:या रॅकेटने ग्रामविकास व जलसंधारण, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग आणि शिक्षण संचालक यांच्याकडील आदेशात एकाचवेळी दहा ते 12 उमेदवारांची नावे टाकून ती जिल्ह परिषदेत दाखल केली आहेत. जिल्हा परिषदेतील अधिका:यांनी डोळ्यावर पट्टी बांधून थेट नियुक्त्या दिल्याचे समोर येत आहे.चौकशी ...

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : बोगस शिक्षक भरती करणा:या रॅकेटने ग्रामविकास व जलसंधारण, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग आणि शिक्षण संचालक यांच्याकडील आदेशात एकाचवेळी दहा ते 12 उमेदवारांची नावे टाकून ती जिल्ह परिषदेत दाखल केली आहेत. जिल्हा परिषदेतील अधिका:यांनी डोळ्यावर पट्टी बांधून थेट नियुक्त्या दिल्याचे समोर येत आहे.चौकशी अहवालानुसार 71 पैकी 31 जणांचे तद्दन खोटे कागदपत्र असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली. आता 40 जणांच्या कागदपत्रांची तपासणी होत आहे. ते देखील संशयाच्या भोव:यात आहेत. या 71 मध्ये पहिल्या दहा जणांची नियुक्ती देतांना त्यांच्या फाईलला ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाचे आदेश जोडण्यात आलेले नाहीत केवळ शिक्षण संचालकांचे आदेश आहेत. त्यात विजय गजमल बोरसे, तुषार सुरेश पाटील, उमेश संतोष महाजन, सचिन रघुनाथ पाटील, अमित अरविंद देशमुख, प्रमोद बाबुलाल शिंदे, राजेंद्र सुरेश काकुस्ते, विक्रांत राजेंद्र नांद्रे व अशोक परशुराम पाटील यांचा समावेश आहे. यांचे शिक्षण संचालकांकडील आदेश पत्र क्र.प्राशिस/असशियो/समायोजन/2016-17/5498, दि.11-11-16 असा आहे. जिल्हा परिषदेने त्यांना जा.क्र.जिपन/शिक्षण/प्रा./समायोजन/157/17/ दि.10-4-17 अन्वये नियुक्ती दिली आहे.कुणाल नानाभाऊ गुरव, प्रतिमा कृष्णराव भामरे, संदीप वसंत परदेशी, वैभव भटू सोनवणे, भगवान पंडित गढरी, स्नेहल सुरेश पाटील, शत्रुघ्न चंदन बच्छाव यांचे ग्रामविकासचा संकिर्ण-5017/प्र.क्र.109/आस्था-9, दि.28-2-2017 चा आदेश आहे. शालेय शिक्षण विभागाचा आयडीएस-2017/153/13/टीएनटी-5, दि.30-5-17 तर शिक्षण संचालकांचे समायोजन/2016/19623/28, दि.4-10-16 आदेश आहेत. जिल्हा परिषदेने त्यांना 15-72017 अन्वये नियुक्ती आदेश दिले आहेत. सुनील नामदेव पाटील, मनोजकुमार सुरेश पाटील, प्रशांत साहेबराव शिंदे, विवेक सुधाकर कुळकर्णी, समाधान नामदेव पाटील, योगेश राजेंद्र खैरनार, किरण हिरामण पाटोळे, भुषण धनराज खलाणे, भगवान चिंधा पाटील, रवींद्र नगराज पाटील, एकनाथ उत्तम पावरा, विजेंद्र ग्यानसिंग पावरा, प्रतिभा रामचंद्र पाटील, प्रमिला कानसिंग चव्हाण, ताराचंद जंगू चव्हाण, विक्की रमेश मराठे व विशाल रमेश मराठे यांच्या फाईलीत ग्रामविकास, शालेय शिक्षण विभागाचे आदेश नाहीत केवळ शिक्षण संचालक व उपसंचालक यांचे आदेश आहेत. शिक्षण संचालकांचे आदेश समायोजन/600/3066/2012, दि.3-5-2012 अन्वये आहेत. जिल्हा परिषदेने त्यांना 13 जुलै 2017 च्या आदेशान्वये नियुक्तीपत्र दिले आहे.पंकज संतोष माळी, उर्मिला श्रीराम माळी, मच्छिंद्र उत्तम बि:हाडे, अविनाश मनोहर वाघ, रुपेश सुरेश भदाणे, पिन्टीबाई भिमराव शिरसाठ व निलेश कानभाऊ काटे यांचे देखील ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाचे आदेश नाहीत. शिक्षण संचाकलकांचा प्राशिसं/अएशियो/नयुमाप्र/08/09/600, दि.26-2-2009 चा आदेश असून त्यानुसार जिल्हा परिषदेने त्यांना समायोजन/177/17, दि.18-4-2017 अन्वये नियुक्ती पत्र दिले आहे. परंतु यांच्या शे:यामध्ये रिट याचिका 1940/2016 दाखल केली होती. रिट याचिकेचा निकाल 19 डिसेंबर 2016 रोजी लागलेला असून सदरील विशेष शिक्षकांना शासन निर्णय मधील तरतुदीनुसार रिक्त पदांवर चार महिन्याच्या आत सामावून घेत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.अनिल पंडित पाटील यांना शिक्षण संचालकांच्या समायोजन/2010-11/600/3152, दि.2-5-2012 अन्वये आदेश दिले आहेत. त्यांचीही नियुक्ती 19 डिसेंबर 2016 दाखविण्यात आली आहे.पंकज पुरुषोत्तम पाटील, मुकेश श्रीराम पाटील, उदय गोरख पाटील, भुषण गोकुळ पाटील, संदीप रमेश पाटील, रोशन सुभाष मोरे, राकेश सुरेश चौधरी, विशाल डिगंबर पाटील, मनोहर सुधाकर पाटील, उमेश दादाजी खैरनार, अमोल सुरेश शिंपी, संदीप पंढरीनाथ साळुंके व सचिन वसंत मराठे यांना शिक्षण संचालकांच्या समायोजन/2016-17/600/1159, दि.15-3-2017 च्या आदेशान्वये जिल्हा परिषदेने 30 जून 2017 अन्वये नियुक्ती पत्र दिले आहे.सोनाली रवींद्र पाटील, गणेश सुरेश पाटील, हिराबाई प्रकाश पवार, किरण मुरलीधर पवार, शिलेश रवींद्र पाटील, सतिष शामकांत पाटील, सुहास हेमराज पाटील यांचे शिक्षण संचालकांकडील आदेश समायोजन/2015-16/600/5497/2016, दि.18-112016 या पत्रान्वये जिल्हा परिषदेने त्यांना 30 जून 2017 रोजी नियुक्ती दिली आहे. विलास बाबुराव माळी, विनय उत्तम पाटील, तुषार मधुकर देवरे, दिपक भगवान नागमल, महेंद्र गोविंदराव अहिरे, कल्पेश कृष्णा चौधरी व राकेश सुरेश नेरकर यांना ग्रामविकास विभागाचे 4 मे 2017, शालेय शिक्षण विभागाचे 22 नोव्हेंबर 2016 व शिक्षण संचालकांचे समायोजन 2017/9386/91, दि.26-5-2017 च्या आदेशान्वये जिल्हा परिषदेने त्यांना 15 जुलै 2017 रोजी रुजू केले आहे तर शितल रमेश साळवे यांना केवळ शिक्षण उपसंचालकांच्या समायोजन/2017/959/98, दि.29 मे 2017 च्या नियुक्तीपत्रावरून 15 जुलै 2017 रोजी जिल्हा परिषदेने रुजू केले. गणेश कौतिक पाटील यांना शिक्षण संचालकांच्या समायोजन/2008-09/600, दि.19 नोव्हेंबर 2008 च्या आदेशान्वये जिल्हा परिषदेने 13 जुलै 2017 रोजी रुजू केले आहे.