नंदुरबार जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या या ९१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामपंचायतींवर आदेशात नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित पंचायत समितीचे कृषी, पंचायत, आरोग्य, शिक्षण विस्तार अधिकारी यांची मूळ कार्यभार सांभाळून ग्रामपंचायत निवडणूक होईल. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कारभार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
जानेवारी २०१९ अखेर मुदत संपून प्रशासक नेमल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये शहादा तालुक्यातील वडछिल व शोभानगर या दोन ग्रामपंचायतीच्या सहभाग आहे, तर तळोदा तालुक्यातील धनपूर, रांझणी, अलवान, कोठार रतनपाडा, सावरपाडा, रामपूर, तऱ्हावद, गंगानगर, जीवननगर, सिलिंगपूर, खर्डी खुर्द, बेलपाडा, अमोनी, अंमलपाडा, खूषगव्हाण, खर्डी बुद्रूक, धवळीविहीर, रापापूर, चौगाव खुर्द या २० ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. अक्कलकुवा तालुक्यातील आमली, आंबाबारी, ब्रिटिश अंकुशविहीर, दहेल, गंगापूर, गव्हाळी, गुलीउंबर, होराफळी, हुणाखांब, जमाना, जांभीपाणी, काकडखुंट, कौली, खडकापाणी, खटवानी, कोराई मोगरा, मोरखी, नवानागरमुथा, नवापाडा, रामपूर, रायसिंगपूर, साकलीउमर सल्लीबार, सरी, तालंबा, ठाणाविहीर, उदेपूर, वालांबा या २९ ग्रामपंचायतीचा सहभाग आहे. धडगाव तालुक्यातील छापरी, खडक्या, सोन बुद्रूक, नंदलवड, राडीकमल, मनखेडी बुद्रूक, पालखा, तलई, मोख खुर्द, मोख बुद्रूक, चिखली वेलखेडी, अस्तंबा रेवेन्यू, पाडामुंड, सुरवाणी, भूजगाव, गोरंबा, मोडलगाव, असली, खांडबारा या २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील कडवान मोठे, कडवान लहान, करंजी बुद्रूक, कामोद, खानापूर, चितवी, दापूर, देवळीवाडा (चि), नगारे, निजामपूर, निमदर्डा, बिलमांजरे, मेहंदीपाडा, मोवलीपाडा, वडसत्रा, वागदी या १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.