लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापीवरील 22 उपसा सिंचन योजनेची मंजुर कामे तीन महिन्याच्या आत पुर्ण करण्याची ग्वाही अधिका:यांनी रविवारी झालेल्या बैठकीत दिली. दरम्यान, जे ठेकेदार वेळेत काम करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावे व कामांना जे विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिल्या. तापीवरील 22 उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्तीच्या कामांसाठी शेतक:यांनी उपोषण केले होते. 2 रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानुसार रविवारी बैठक झाली. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील व संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व अधिका:यांकडून मंजुर असलेल्या कामांनुसार सद्य स्थिती जाणून घेतली. त्यानंतर शेतक:यांचे म्हणने ऐकुण घेण्यात आले. त्यात तफावत दिसून आली. दीपक पाटील यांनी मंजुर कामे आधी सुरू करा ही कामे झाल्यावर पुढच्या कामांचे पाहू असे सांगितले. पहिले पाणी कधी मिळेल ते सांगा असे निर्वाणीचे सांगिगतले. त्यामुळे अधिकारीही चाचपडले. जिल्हाधिका:यांनी त्यानंतर सर्व संबधीत अधिका:यांकडून कुठले काम कधी पुर्ण होईल याची तारीख जाणून घेतली. साधारणत: तीन महिन्याच्या आत काम पुर्ण होईल या निष्कर्षाप्रत जिल्हाधिकारी आले. त्यांनी ही कामे पुर्ण होईर्पयत संबधीत विभागाचे अधिकारी, ठेकेदार, शेतकरी यांची समन्वय बैठक दर 15 दिवसात घ्यावी. तसा अहवाल द्यावा. जे कुणी ठेकेदार कामात दिरंगाई करतील. कामचुकार पणा करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून प्रसंगी काळ्या यादीत टाकावे. पाईपलाईन टाकणे, वीज खांब उभारण्यालाही कुणी अडथळा आणत असतील तर अशा लोकांवरही थेट सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करावे असे आदेश जिल्हाधिकारी मंजुळे यांनी दिले.यावेळी माजी आमदार अॅड.के.सी.पाडवी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, तापी खो:याचे कार्यकारी अभियंता आमले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शेतकरीउपस्थित होते. यामुळे उपसा सिंचन योजना सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
उपसा योजनेची मंजूर कामे तीन महिन्यात पुर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:56 PM