शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बंधारा येथे कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:26 PM

लक्ष देण्याची गरज : गेल्या एक वर्षापासून ट्रान्सफार्मर नादुरुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील बंधारा या आदिवासी गावातील विजेच्या ट्रान्सफार्मर गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त असल्याने या गावाच्या पाणीपुरवठादेखील विस्कळीत झाला आह़े परिणामी रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची व्यथा आह़े प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तातडीने नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याची ताकीद संबंधितांना द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आह़े तालुक्यातील बंधारा हे गाव सातपुडय़ातील बंधारा हे गाव सातपुडय़ाच्या पायथ्याशी वसले आह़े या गावाची लोकसंख्या साधारण दीड ते दान हजार आह़े संपूर्ण आदिवासी गाव आह़े परंतु या गावातील विजवितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर गेल्या वर्षापासून नादुरुस्त आह़े अजूनही नवीन ट्रान्सफार्मर ग्रामस्थांना बसवून देण्यात आलेला नाही़ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा या ट्रान्सफार्मरवरच जोडला असल्याने पाणीपुरवठासुध्दा यामुळे प्रभावीत झाला आह़े परिणामी ग्रामस्था कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आह़े पाण्यासाठी ग्रामस्थांना जवळच्या धरणाचा आसरा घ्यावा लागत आह़े गावात दोन हातपंप असले तरी त्यातील एक हातपंप अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आह़े जो सुरु आहे त्यातूनही पुरेसे पाणी निघत नसल्याने रहिवाशांना पिण्याचा पाण्याचा समस्येस तोंड द्यावे लागत आह़े या शिवाय पाण्याअभावी तेथील घरकुले आणि शौचालयांचे बांधकामेदेखील रखडली आहेत़ वास्तविक गेल्या वर्षभरापासून तेथील ट्रान्सफार्मर नादुरुस्त आह़े नवीन डी़पी़ साठी ग्रामपंचायतीच्या पदाधिका:यांमार्फत संबंधित विजवितरण कंपनीच्या कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आह़े मात्र केवळ बिलाची थकबाकी आणि जोडण्यांअभावी यंत्रणा नवीन ट्रान्सफार्मर देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आह़े विजवितरण कंपनीत काही ग्राहकांच्या विजजोडण्या खंडीत केल्यानंतर त्यांनी न्यायालयामार्फत वीज बिले भरली आह़े तसेच ग्रामस्थांनी नवीन जोडण्यांचीही मागणी केली आह़े या उपरांतही नवीन डी़पी़साठी संबंधित अधिका:यांनी सकारात्मकता दाखवली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े इकडे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण करावी लागत आह़े यासाठी मजुरांना रोजंदारीदेखील बुडवावी लागत आह़े अशी वस्तूस्थिती असताना वरिष्ठ लोकप्रतिनिधीही याकडे साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन कृत्रिम पाणी टंचाईला उदभवलेला प्रश्न मिटवावा अशी मागणी आह़े गेल्या मे महिन्यात आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या तालुक्याच्या आमसभेतदेखील बंधारा येथील जळीत ट्रान्सफार्मरचा प्रश्न ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थित केला होता़ वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांनी चौकशी करुन तातडीने ट्रान्सफार्मर जोडण्याचे आश्वासन देण्यात आले होत़े त्यानंतर संबंधितांनी डी़पी़ बसविली नाहीच मात्र पाठपुरावा करुनही अजूनर्पयत कार्यवाही करण्यात आलेली नाही़ वास्तविक आमसभेत दाखल  झालेली तक्रारीची लगेच दखील घेण्याचा दंडक आह़े पंरतु संबंधित यंत्रणेने तोही धाब्यावर बसविल्याचा ग्रामस्थांचा आरोप आह़े