लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : पाणीपुरवठय़ाचे वीज बिल थकल्याने महातिवरणकडून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आह़े त्यामुळे तळोदा तालुक्यातील लोभाणी, बुधावल, गोविंदमळ, सिव्रे भाबळुपुर, ङिारी तसेच शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आह़ेमहावितरणच्या शहादा उपविभागातील 302 ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठय़ाचे 18 कोटी 69 लाख रुपयांचे वीज बिल थकीत आह़े त्या गावाचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यासह, शेती व जनावरांसाठीदेखील पाण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आह़े त्यामुळे परिसरातील शेतक:यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आह़े महावितरणकडून ऐन हंगामाच्या वेळी अशा प्रकारे कारवाई करण्यात येत असल्याने सर्वसामान्य शेतक:यांकडून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे महावितरणने थकबाकी भरण्यास मुदत वाढ द्यावी अशीही मागणी आता जोर धरु लागली आह़े शहादा उपविभागाअंतर्गत शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव असे चार तालुके येतात़ महावितरणकडून 302 ग्रामपंचायतींना संबंधित गावांमधील टय़ुबवेल तसेच विहिरींना पाणीपुरवठय़ाचे कनेक्शन देण्यात आले आह़े परंतु 18 कोटी 69 लाखांचे वीज बिल थकीत असल्यामुळे वारंवार सूचनादेऊनही संबंधित ग्राहकांकडून वीज बिल भरण्यात येत नसल्याने महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली़ परिणामी शहादा तालुक्यातील मलोणी, मादा, तोरखेडा, वरुळ, पुसनद, खैरवे, अनरद, बामखेडा, नादरखेडा तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा, कडुमटू, रामपूर, राजमोही, अमरकुवा आदी गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े आधीच परिसरात यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने पिक जगविण्यासाठी शेत:यांकडून पाण्यासाठी वणवण करण्यात येत आह़े त्यातच आता महावितरणकडून वीजपुरवठाही खंडीत करण्यात आल्याने शेतक:यांच्या समस्येत अधिकच भर पडत असल्याचे सांगण्यात येत आह़े थकबाकी भरण्यास ग्रामपंचायतींमध्ये ठणठणाटथकबाकीबाबत सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी व जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वळवी, तालुका सरपंच संघटनेचे सल्लागार जयसिंग माळी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व घरपट्टीतून मिळणारा ग्रामनिधी हा ग्रामपंचायत पाणीपुरवठा अधिकारी, सफाई कर्मचारी, विकासकामे, कृषीपंप दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, विविध योजना आदी कामांमध्ये खर्च होत असतो़ त्यामुळे पाणीपुरवठय़ाचे वीज बिल भरण्यास ग्रामपंचातींमध्ये ठणठणाट असल्याचे दिसून येत असत़े त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठय़ाचे बिल भरण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातून स्वतंत्र निधीची तरतुद करण्यात यावी अशीही मागणी आता जोर धरु लागली आह़े दरम्यान, महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यात येत आह़े व संबंधितांनी त्वरीत थकबाकी भरावी हे आवाहनही करण्यात येत आह़े परंतु ऐवढी मोठी रक्कम भरण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े त्यामुळे महावितरणकडून थकबाकी भरण्यासाठी अजून वेळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात ेयेत आह़े त्यामुळे या मागणीकडे महावितरण लक्ष देणार काय हा प्रश्न निर्माण होत आह़े
अक्कलकुवा व तळोदा तालुक्यांत वीजपुरवठय़ाअभावी कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:54 PM