लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षापर्यटनासाठी पहिली पसंती ठरणा:या तोरणमाळकडे जाणा:या रस्त्यांवर झाडे पडून दरड कोसळल्याने सोमवारी पुन्हा रस्ते बंद झाल़े यामुळे तोरणमाळकडे जाणारी व येणारी वाहतूक बंद झाली होती़ प्रशासनाकडून दरड आणि झाडे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले होत़े शनिवार आणि रविवारचे औचित्य साधून राज्याच्या विविध भागातून पर्यटक तोरणमाळ येथे वर्षापर्यटनासाठी आले होत़े रविवारी दिवसभर पावसामुळे लेंगापाणी फाटय़ापासून सातपायरी घाटापर्यंत जागोजागी दरडी कोसळल्याने रस्ता बंद झाला होता़ काही ठिकाणी रस्ता खचल्याने वाहने निघणेही मुश्किल झाले होत़े वनविभागाच्या अधिका:यांनी तातडीने सार्वजनिक पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर वाहतूक थांबवण्यात आली़ तसेच बांधकाम विभाग आणि तालुका प्रशासन यांनी दरडी हटवण्याचे काम सुरु केले होत़े रविवारी दुपारी वाहतूक काहीअंशी सुरळीत करण्यात आल्यानंतर वाहने मार्गस्थ झाली होती़ परंतू सायंकाळी पुन्हा दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आह़े सोमवारी सायंकाळर्पयत रस्ता बंद असल्याने तोरणमाळचा संपर्क तुटल्याचे स्पष्ट झाले आह़े यात या भागातील दूरसंचार विभागाचा टॉवर बंद असल्याने दूरसंचार विभागाची मोबाईल सेवा बंद आह़े तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्याने तोरणमाळ आणि परिसरातील पाडे अंधारात होत़े वनविभागाकडून वर्षापर्यटनासाठी जाणा:यांना तूर्तास मनाई केली असून दरडी काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच पर्यटकांनी येण्याचे सांगण्यात येत आह़े
सोमवारी सकाळी काही हौशी पर्यटक तोरणमाळकडे निघाले होत़े परंतू वनविभागाच्या अधिका:यांकडून त्यांना राणीपूर येथूनच परत पाठवल़े जागोजागी दरडी कोसळत असल्याने रस्ता धोकेदायक बनला आह़े लेंगापाणी फाटय़ाजवळ रस्ता पूर्णपणे खचल्याने धोकेदायक स्थिती निर्माण झाला आह़े यात पावसानेही विश्रांती घेतलेली नसल्याने सातपुडय़ाच्या द:याखो:यातून नदी-नाले दुथडी भरुन वाहत होत़े श्रावण सोमवार असल्याने मोठय़ा संख्येने भाविक तोरणमाळकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले होत़े परंतू वाहने जाऊ शकत नसल्याने दुपार्पयत बहुतांश वाहने राणीपूर भागात थांबली होती़ लेंगापाणीपासून काही भाविक पायी गेल्याची माहिती आह़े सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरडी काढण्यासाठी वाहने मागवण्यात येत आहेत़ परंतू संततधार पाऊस सुरु असल्याने दरडी हटवण्याच्या कामात व्यत्यय आल्याची माहिती देण्यात आली आह़े