लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सुरू असलेल्या जिभाऊ करंडक राज्यस्तरीय स्पर्धेच्या एकांकीकामधून कलाकार समाज जीवनाचा ठाव घेत आहे. विविध पात्रांनी केलेल्या भूमिकांमधून ते समाजजीवन देखील उलगडत आहे.नाट्योत्सवाचा आनंद अवघ्या जिल्ह्यातील चोखंदळ रसिकांना घेता यावा म्हणून मागील नऊ वर्षांपासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. यातून समाजातील अगदी तळागाळातील मानवी जीवन, नागरिकांच्या समस्या, प्रथा-परंपरांची जाणीव करुन देणाऱ्या एकांकिका सादरर करण्यात येत आहे. काबाडकष्ट करीत घर चालवणारे कुटुंब अशा समाजाच्या वास्तव वेदना यातून मांडल्या जात आहे.स्पर्धेच्या दुसºया दिवशी पहिल्या दिवसाच्या तुलनेत नाट्यरसिकांची संख्या दुपटीने वाढली. हीच बाब जिल्ह्यात नाट्य चळवळ रुजत असल्याचे स्पष्ट करुन जाते. दुसºया दिवाशी उपस्थित झालेल्या रसिकांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी व युवकांची संख्या अधिक दिसून आली. त्यातही विद्यार्थिनी तथा युवती अधिक होत्या. सादर करण्यात आलेल्या एकांकिका या प्रामुख्याने सामाजिक जीवन दर्शविणाºया, समाजजीवनाचा ठाव घेणाºया होत्या. त्यामुळे उपस्थित युवक व युवतींमधील सामाजिक भावनेत निश्चीतच भर पडेल, यात शंका नाही. सामाजिक पातळीवर आवश्यक असलेल्या या बाबींचा त्यांच्या विकास होऊन त्यांच्यातील कल्पना, कथा विलक्षण क्षण यामधून नाटके देखील जागृत होऊ लागले आहे.नाट्यप्रयोग सूरू असतांना कलाकारांसह रसिकांना कुठलाही अडथळा येणार नाही, त्रास होणार यासाठी आयोजन समितीमार्फत नियोजन करण्यात येत आहे. एकदा नाटक सुरू झाल्यानंतर कुठल्याही रसिक अथवा कलाकाराला नाट्यगृहात घेतले जात नसल्यामुळे प्रत्येक रसिकांनी सोबतीला सहकारी असले तरी एकांतात नाटकांचा आनंद घेत आहे. या स्पर्धेत एकुण २१ नाट्यसंस्था सहभागी झाले असून त्यात महाराष्टÑासह इंदौरच्या काही नाट्यसंस्थांनी देखील सहभाग घेतला. त्यातून पहिल्या दिवशी नऊ एकांकिका सादर करण्यात आल्या. तर दुसºया दिवशी १० एकांकिका सादर करण्यात आल्या. त्यात सकाळच्या सत्रात चार एकांकिका तर दुपार व सांकाळपर्यंत सहा अशा प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले.अखेरच्या दिवाशी सकाळच्या सत्रात निर व गुलाबाची मस्तानी हे दोन नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. परिक्षकांचा परिसंवाद होणार आहे. यात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, गंगाराम गवाणकर, प्रशिक्षक शिवदास घोडके, अभिनेता आत्माराम बनसोडे यांच्यासह अनेक तज्ञ सहभागी होणार आहे. त्यानंतर बक्षिस वितरण होणार असून स्पर्धे दरम्यान हास्य कलाकार विलासकुमार शिरसाठ यांची स्टॅडअप कॉमेडीचा कार्यक्रम होणार आहे.काबाडकष्ट करणाऱ्यांचा जिल्हा असल्याचे म्हटले जात असले तरी नंदुरबार जिल्ह्यात काही घटक कला व अभिनयाशी निगडीत असलेला देखील जिल्ह्यात विखुरला आहे. नऊ वर्षापासून होणाºया या एकांकिका स्पर्धांमुळे कलाकारांमधील कलेला चालना मिळत आहे. या कलेला चांगले दिवस आणण्यासाठी जिल्ह्यात नाटकांचे अन्य उपक्रम देखील होणे अत्यावश्यक आहे. शिवाय उपक्रम राबविणासाठी संस्थानीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे साहित्य क्षेत्रातून मत व्यक्त करण्यात येत आहे.दुसºया दिवशी सादर नाट्यप्रयोग व संस्थामानस- सर्वमान्य नाट्यसंस्था, इंदौरएका तपासाची गोष्ट- जळगांव जनता बँक, जळगांवमजार- रंगायन नाट्यसंस्था, इंदौरअरण्य- डॉ.हेमंत कुलकर्णी अॅण्ड समुह, जळगांवशेवट तितका गंभीर नाही- रंगायन, इंदौरभभुत्या- भाग्यदीप थिएटर्स, जळगांववारी- झेड.बी.पाटील महाविद्यालय, धुळे७२ चे गणित- नाहटा महाविद्यालय, भुसावळबट बिफोर लिव्ह- सौंदर्य निर्मित, नासिकमंथन- विजीकिषा थिएटर्स, मुंबई
कलावंतांनी उलगडले समाजजीवनाचे अंतरंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:37 PM