ऑनलाईन लोकमत नंदुरबार,दि.29 - शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्याथ्र्याच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शाळांचे सव्र्हेक्षण सुरू झाले आहे. शासकीय आश्रम शाळेतून विद्यार्थी बेपत्ता होणे, सामानाची चोरी, बहुतांश आश्रमशाळा दुर्गम व डोंगरी भागात असल्यामुळे हिंस्त्र प्राण्यांचा धोका, सर्पदंशचे प्रकार यापासून सुरक्षा मिळावी यासाठी आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत असा प्रस्ताव पुढे आला. सद्य स्थितीत जेमतेम 16 टक्के शाळांमध्ये अशी सुविधा आहे. त्यामुळे सर्वच शाळांमध्ये कॅमेरे बसविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये सव्र्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.
आश्रमशाळांमधील हालचाली होणार सीसीटीव्हीमध्ये कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 6:50 PM