शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

रणरणत्या उन्हात ‘आशां’चे आंदोलन

By admin | Published: April 10, 2017 11:39 PM

जिल्हाभरातून उपस्थिती : सीईओंना दिले मागण्यांचे निवेदन

नंदुरबार : आशा कर्मचा:यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.जिल्हाभरातील आशा व आशा गटप्रवर्तक कर्मचारी सकाळी जिल्हा परिषदेसमोर एकवटल्या होत्या. आयटकच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हातही आंदोलकांचा उत्साह व  जोश कायम होता. त्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, आशा कर्मचा:यांना नियमित कर्मचा:यांचे सर्व लाभ मिळावे, 15 हजार रुपये दरमहा वेतन मिळावे, आरोग्य खात्यातील रिक्त पदांवर आशा कर्मचा:यांची नेमणूक करावी, ग्रामपंचायत, पंचायत            समिती निवडणुकीत निवडून           आलेल्या आशा कर्मचा:यांचे मानधन जिल्हा प्रशासनाने रोखून धरले आहे. त्यांना राजीनामा देण्यास भाग            पाडले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात केस सुरू आहे. त्यामुळे तातडीने मानधन  देण्यात यावे. कर्मचा:यांना मेडिकल किट्स देऊन त्यांची पुनर्भरणी            करावी व आवश्यक कागदपत्रे देण्याची तरतूद करावी. जननी सुरक्षा योजनेतील आशांसाठी वाहतूक व इतर खर्च वेगळा मिळून गरोदर मातेसाठीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी. एपीएल व बीपीएल असा भेदभाव न करता प्रसूती होणा:या लाभार्थी महिलेस व आशा कर्मचा:यास जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा आदींसह इतर विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे.या वेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले, राज्य सदस्या वैशाली खंदारे, राष्ट्रीय सदस्या ममता वसावे, जिल्हाध्यक्षा ललिता माळी यांच्यासह पदाधिकारी व शेकडो आशा कर्मचारी उपस्थित होत्या.