यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साळवे व सुवर्णा सोलंकी, कार्यालय अधीक्षक पी. एफ. वसावे, एन. एन. कोकणी, शिक्षण विस्तार अधिकारी एन. डी. ढोले, जी. डी. अखडमल आदी उपस्थित होते.
या सहविचार सभेत शिक्षण सेतू अभियानाबाबत माहिती देण्यात आली. सहायक प्रकल्प अधिकारी साबळे यांनी सांगितले की, गावोगावी जाऊन सरपंच, लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेणे, विद्यार्थ्यांना सातत्याने भेट देऊन सवांद साधणे, महिन्यातून दोन ते तीन वेळा पालकांच्या भेटी घेणे, पाठयपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांची पोहोच घेणे यासह इतर विषयांच्या सूचना दिल्या. याशिवाय डीबीटी स्टुडंट व्हेरिफिकेशनबाबत कार्यवाही अहवाल, विद्यार्थी पटसंख्या, पहिली ते १२ वी मंजूर भरलेल्या रिक्त स्थितीचा अहवाल, पहिली ते १२ वी विद्यार्थ्यांचे निकाल प्रपत्र अ, ब, क, ड बाबत माहिती, आश्रमशाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे मृत्यू, महिला तक्रार निवारण समितीचा आदेश याबाबत हार्ड कॉफी सोबत आणावी. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपबाबत माहिती. पहिली ते आठवी याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल, बीव्हीजी आरोग्य तपासणी, लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात सोबत आणावी, शिक्षण सेतू माहिती व प्रत्यक्ष भेटी अहवाल, शिक्षण सेतू उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी केलेली कार्यवाही अहवाल, आठवी ते १२ वी विद्यार्थी उपस्थिती अहवाल, तसेच विद्यार्थी उपस्थिती वाढविण्याबाबत केलेला कार्यवाही अहवाल, आदर्श आश्रमशाळा देवमोगरा येथे प्रवेशासाठी प्रवेश पत्र अहवाल, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या सभेत तळोदा तालुक्यातील अनुदानित व शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. सभेसाठी राणीपूर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.