लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आश्रमशाळेतील शैक्षणिक कामकाजाबाबत नोटीसा देऊनही सुधारणा न करता थेट विनापरवानगी शाळेत गैरहजर आढळून आल्याने धडगाव तालुक्यातील चुलवड येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. दरम्यान, बर्डी येथील मुख्याध्यापकाची वेतनवाढ रोखल्याची माहिती प्रकल्पाच्या अधिकृत सूत्रांनी दिली. दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या कारवाईच्या कडक भूमिकेने आश्रमीय कर्मचा:यांमध्ये खळबळ उडाली आहे.धडगाव तालुक्यातील चुलवड येथील शासकीय आश्रमशाळेचे विद्यार्थी आश्रमशाळेतील असुविधांबाबत तळोदा प्रकल्पात तक्रार करण्यासाठी येत असल्याची वार्ता प्रकल्प प्रशासनास मिळाली होती. प्रकल्पाधिकारी जितेंद्र डुडी, सहायक प्रकल्पाधिकारी अमोल मेटकर, सुवर्णा सोलंकी व शिक्षण विस्तार अधिकारी एम.एस. कदम हे गुरूवारी आश्रमशाळेत पोहोचलेत. या वेळी विद्याथ्र्यानीच त्यांच्याकडे शाळेतील समस्यांचा पाढा वाचला. शिवाय त्यांना देय असलेल्या सुविधादेखील मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विद्याथ्र्यानी सांगितले.स्वत: मुख्याध्यापक डी.एन. पाटकरी हे प्रशासनाच्या भेटी वेळी विनापरवानगी गैरहजर आढळून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रकल्प प्रशासनाने तडका फडकी निलंबनाची कारवाई केली असून, या आदेशात शालेय व्यवस्थापनावर नियंत्रण न ठेवणे, आस्थापनाकडे दुर्लक्ष करणे, मुख्याध्यापक पदाच्या जबाबदा:या पार न पाडणे, शाळेसाठी निधी उपलब्ध करूनही तो न वापरणे, शालेय व्यवस्थापन निधी खर्चाचा हिशोब कार्यालयास सादर न करणे आदी कारणे नमूद करून याबाबत नोटीसा बजावून कामात सुधारणा न करता खुलासाही दिला नाही. आपल्या हलगर्जीपणामुळे विद्याथ्र्यानी पायी मोर्चा काढल्याचे म्हटले आहे.दरम्यान, बर्डी, ता.अक्कलकुवा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तपासे यांच्यावरदेखील तेथील विद्याथ्र्याच्या तक्रारीवरून वेतन वाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. आश्रमशाळेच्या या दोन मुख्याध्यापकांवर प्रकल्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे आश्रमीय कर्मचा:यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
आश्रमशाळा मुख्याध्यापक तडकाफडकी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:48 PM