नंदुरबार : खामगाव रोडवरील शासकीय आश्रमशाळा परिसरात सुरु असलेल्या तोरणमाळ येथील आंतरराष्ट्रीय निवासी शाळेला ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आल़े मुंबई येथून डिजीटल बोर्डच्या माध्यमाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते हे नामकरण करण्यात आल़े प्रसंगी शाळेत आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ़ एम़ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती हिराबाई पाडवी, तोरणमाळचे सरपंच मधुक चौधरी, पंचायत समिती सदस्या सुमनबाई चौधरी, अनिल भामरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी राहुल चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम़व्ही़ कदम उपस्थित होत़े प्रारंभी तोरणमाळसह (नंदुरबार) राज्यात सुरु करण्यात 12 आंतरराष्ट्रीय निवासी शाळांचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असे नामकरण करण्यात आल़े मुंबई येथून डिजीटल साईनबोर्डच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे व डॉ़ विजय भटकर हे प्रसंगी उपस्थित होत़े कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ़ गावीत यांनी सांगितले की, शिक्षणापासून दुर्लक्षित असलेल्या तोरणमाळसारख्या अतीदुर्गम भागात आदिवासी विद्याथ्र्याना आंतरराष्ट्रीय शाळा सोयीची होणार आह़े जिल्हाधिकारी तोरणमाळ भागातील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात शिक्षणापासून वंचित होत़े अशा विद्याथ्र्याची सोय होत आह़े उत्तम शिक्षण देणा:या शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शाळेत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल घडून येणार आहेत़ आमदार उदेसिंग पाडवी, हिराबाई पाडवी यांनी यावेळी मार्गदर्शन केल़े प्रास्ताविक शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी केल़े आभार शिक्षणाधिकारी कदम यांनी केल़े
आंतरराष्ट्रीय निवासी शाळेला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:52 PM