लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात एरंडी पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आह़े त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपासून हा प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े परिसरात मागील काही वर्षापासून बहुतेक शेतकरी एरंडीचे उत्पादन घेत आहेत़ येथील शेतकरी भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवत ज्या पिकाला मागणी आहे त्याच पिकांची लागवड करण्यावर विश्वास ठेवणारा असल्याचे म्हटले जात़े एरंडी या पिकाचे तालुक्याच्या सिमेला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या सिमावर्ती भागात मोठी मागणी आह़े त्यामुळे या ठिकाणी या पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जात असत़े परंतु मागील दोन वर्षापासून या पिकावर अळयांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यातच काही दिवसांमध्ये याचा अधिकच प्रादुर्भाव जाणवू लागला असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़े या पिकांवर अळ्यांच्या अचानक झालेल्या आक्रमणामुळे बळीराजादेखील परता हवालदिल झाला असल्याचे चित्र दिसून येत आह़े परिसरात सर्वाधिक पिक एरंडीचे घेतले जात असल्याने यामुळे पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आह़े पानांवर अळ्यांचे अतिक्रमणया अळ्यांचे पिकाच्या पानावरच आक्रमण होत आह़े अळ्या संपूर्ण पान हळुहळु खाऊन टाकत असल्याने पिक निरुपयोगी ठरत आह़े अळ्या पाने खाऊन टाकत असल्याने पिकांची वाढदेखील खुंटत असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े विशेषत पानाच्या पृष्ठभागावर या अळ्यांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आह़े अळ्यांमुळे पिकांची पाने कोरडी पडत आहेत़ सध्या एरंडीच्या पिकांची वाढ होण्यासाठी हे पोषक दिवस आहेत़ त्यामुळे ऐन वाढीच्याच वेळी अशा प्रकारे अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े इतर पिकांनाही धोकाएरंडीच्या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे या पिकांची वाढही खुटत आह़े ही चिंता असताना थोडय़ा फार प्रमाणात घेण्यात आलेल्या इतरही पिकांवर याचा प्रादुर्भाव होतो की काय अशी चिंता आता शेतक:यांसमोर उभी ठाकली आह़े
एरंडीवर अळ्यांचा होतोय प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:45 AM