लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील तुलसीविहारातील घरफोडी करणाऱ्या नंदुबारातील अट्टल घरफोड्यास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्यावर यापूर्वी देखील आठ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीतील पाच हजार रुपये जप्त करण्यात आले.नंदुरबारातील तुलसीविहारात राहणारे मधुकर शेवाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच हजार रुपये रोख व २० हजारांचे दागीने असा एकुण २५ हजारांचा ऐवज चोरी झाला होता. याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास एलसीबी देखील करीत होती. चोरीचा संशय नंदुरबारातील चिंचपाडा भिलाटीतील चंद्रशेखर नथ्थू मेश्राम उर्फ याच्यावर होता.त्यानुसार त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. तो बाहेरगावी पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला चिंचपाडा भिलाटीत पाठविले. तेथून तो पसार झाल्याचे लक्षात आल्यावर नवापूर चौफुली व साक्री चौफुलीवर तपास केला असता नवापूर चौफुलीवर तो येणाºया-जाणाºया वाहनांना हात देऊन थांबविण्याचा प्रयत्नात होता.तेथे पोलीस पथक आल्याचे पहाताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. त्याने चोरीची कबुली देत पाच हजार रुपये काढून दिले.त्याच्यावर यापूर्वी देखील चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार राकेश मोरे, राकेश वसावे, दादाभाई मासुळ, अभय राजपूत, आनंदा मराठे, राजेंद्र काटके यांनी केली.
अट्टल घरफोड्या चंदू जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:07 PM