लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील गजबजलेल्या परिसरात असलेल्या हस्ती को ऑपरेटीव्ह बँकेचे चॅनलगेट तोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला़ यात केवळ 21 हजार 300 रूपयांची रोकड चोरटय़ांच्या हाती लागली़ मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता़ पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत लगतच्या चेंबरमध्ये असलेला सीसीटीव्हीच्या डिव्हीआरची केबल कापत लॉकर रूमकडे मोर्चा वळवला़ याठिकाणी रोख रक्कम असल्याची माहिती असल्याने चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केला़ मात्र त्यांना स्टाँग रूमचे लॉकर तोडता आले नाही़ याठिकाणी किमान सव्वा तीन कोटी रूपयांची रोख रक्कम असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाने दिली आह़े याच भागात कॅश काउंटरवर पडून असलेले 21 हजार 300 रूपये हाती घेत, ते लंपास केल़े सकाळी चौकीदाराच्या लक्षात हा प्रकार आल्याने एकच खळबळ उडाली़ त्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांसह पोलीस अधिकारी व खातेदार व्यापा:यांनी बँकेकडे धाव घेतली़ या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आह़े
नंदुरबार शहरातील हस्ती बँक फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:47 PM