शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे आठ तासात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न पोलीसांच्या गस्ती पथकाने हाणून ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न पोलीसांच्या गस्ती पथकाने हाणून पाडला़ बुधवारी पहाटे घडलेल्या घटनेतील सहा संशयितांपैकी तिघांना पोलीसांनी अवघ्या साडेआठ तासात ताब्यात घेतले असून तिघेही अट्टल गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आह़े  बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल मुकेश सुभाष तावडे व खुशाल माळी हे गस्त घालत असताना बसस्थानकासमोर परदेशी गल्लीतील स्टेट बँकेच्या एटीएमसमोर चारचाकी वाहन व सोबत दोन व्यक्ती दिसून आल़े कॉन्स्टेबल तावडे यांनी दोघांना हटकल्यावर त्यांनी ‘पोलीस आये भागो’ अशी आरोळी ठोकत गाडीत बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान चारचाकी थेट पोलीसांच्या दुचाकीवर घातली़ परंतू कॉन्स्टेबल तावडे व माळी यांनी उडय़ा मारल्याने त्यांचा जीव बचावला़ हा प्रकार सुरु असताना एटीएममधून गॅस कटरसह  दोघे बाहेर आल्याचे पोलीस कर्मचा:यांना दिसून आल़े त्यातील एकास माळी यांनी पकडल्यानंतर चोरटय़ांपैकी एकाने वाहनातून तलवार काढून ठार मारण्याची धमकी दिली़ या झटापटीत पकडलेल्या चोरटय़ाने हिसका देत पळ काढला़ चोरटे घटनास्थळावरुन चारचाकी वाहनासह पसार झाल्यानंतर दोघा कर्मचा:यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात माहिती दिली होती़ माहितीवरुन दुस:या गस्ती पथकाने शहरात चोरटय़ांचा शोध सुरु करत पाठलाग सुरु ठेवला होता़ माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, नितीन चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, मुकेश पवार यांनी अक्कलकुव्यात  भेट देत माहिती घेतली़ पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी 15 पोलीस अधिकारी व 200 पोलीस कर्मचा:यांच्या सहाय्याने परिसरात कोंबिग ऑपरेशन तर सागबारा आणि कुकरमुंडा येथे नाकाबंदी केली़ यात शहरालगतच्या मोठी राजमोही येथे तिघे अनोळखी लपून बसल्याचे समजल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या़ 

एटीएम फोडण्यात अपयश आल्यानंतर चोरटे एमएच 39 जे 2191 या वाहनाने पळाले होत़े पहाटे चार वाजता  पथकाला गंगापूर नर्सरीजवळ चारचाकी वाहन दिसून आल़े त्यांनी तपासणी केल्यावर त्यात गॅस कटर, सिंलेंडर आणि मोबाईल असे साहित्य मिळून आल़े दुपारी अप्पर पोलीस अधिक्षक गवळी व पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पथकाने मोठी राजमोही येथील एका घरातून जुबेर ऊर्फ ताहिर नूर मोहम्मद, सुरजपाल धरमपाल भारद्वाज दोघे रा़ हरियाणा आणि रमजान भप्पू सक्का रा़ भरतपूर, राजस्थान यांना ताब्यात घेतल़े त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी जमेशद ऊर्फ जाहिद खान, मुकीत खान इम्रद खान व संदीप शर्मा तिघे रा़ हरियाणा यांची नावे सांगितली़ तिघांनीही अक्कलकुवा परिसरातून पळ काढला आह़े 

गुजरात मार्गाने 30 जून रोजी मोठी राजमोही ता़ अक्कलकुवा येथे आलेल्या सहाही गुन्हेगारांनी  सोमवारी शहरातील एटीएमची रेकी केली होती़ चोरी करण्यासाठी  महामार्गावरील एका गॅरेजमधून गॅस कटर आणि सिलींडर चोरी करत त्यांनी नंदुरबारकडे मोर्चा वळवला होता़ मंगळवारी नंदुरबार शहरातून एमएच 39 जे 2191 हे चारचाकी वाहन चोरुन आणले होत़े यानंतर बुधवारी अमावस्येच्या अंधारात एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला़   तिघांना मोठी राजमोही येथे आश्रय देणा:या फय्याज गुलामअली मक्राणी याने नाशिक येथे पळ काढल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतल़े  पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली़ अटकेतील आणि फरार आरोपी हे अट्टल दरोडेखोर असून त्यांनी संगमनेर, कोपरगाव, जळगाव आणि नाशिक येथे एटीएम फोडले असल्याचे सांगितल़े चोरटय़ांचा पाठलाग करणारे मुकेश तावडे यांना 15 तर  खुशाल माळी यांना 11 हजार रुपयांचे रोख बक्षिस पोलीस अधिक्षकांनी जाहिर केल़े  घटनेवेळी एटीएममध्ये 52 लाख रुपये होत़े दोघा पोलीसांच्या धाडसी कामगिरीने बँक ग्राहकांचे 52 लाख रुपये सुरक्षित राहिल्याने त्यांचे कौतूक होत होत़े घटनेतील तिघा फरार संशयितांचा पोलीसांकडून शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े