शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न गरजेचे : नंदुरबार ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वाचन  संस्कृतीला वृध्दीगत करण्यासाठी सर्वाकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा सूर वाचकप्रेमींकडून तळोदा येथे उमटला़ नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संघ व सरकार मान्य मुक्तव्दार वाचनालय नगरपालिका यांच्या वतीने जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथालय संघाचे कार्यकर्ते व सेवक यांचे 17 वे वार्षिक अधिवेशन बुधवारी सकाळी 11 वाजता तळोदा येथील बापुजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वाचन  संस्कृतीला वृध्दीगत करण्यासाठी सर्वाकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा सूर वाचकप्रेमींकडून तळोदा येथे उमटला़ नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संघ व सरकार मान्य मुक्तव्दार वाचनालय नगरपालिका यांच्या वतीने जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथालय संघाचे कार्यकर्ते व सेवक यांचे 17 वे वार्षिक अधिवेशन बुधवारी सकाळी 11 वाजता तळोदा येथील बापुजी मंगल कार्यालयात झाल़े ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक प्रवीण पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल़े अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा़ डॉ़ पीतांबर सरोदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, निखील तुरखिया, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, हैदरभाई नुराणी, अॅड़ गोविंद पाटील, हेमलाल मगरे, अंबिका शेडये, रोहिदास पाडवी, जालींधर भोई, सुरेश पाडवी, प्रदीप शेडये, मितलकुमार टवाळे, ए़टी़ वाघ, रणजीत राजपूत आदी उपस्थित होत़े ई-ग्रंथालयासाठी प्रयत्न.तळोदा शहरातील ग्रंथालयांच्या विकासासाठी प्रयत्न तसेच ई-ग्रंथालय व अभ्यासिका सुरु करत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अजय परेदशी यांनी सांगितल़े ग्रंथालये बंद होणार नाहीतदरम्यान, आजच्या इंटरनेटच्या जगात ग्रंथ तसेच वाचनाकडे दुर्लक्ष झाले आह़े त्यामुळे शासनाने ई-ग्रंथालयाची संकल्पना आणली़ परंतु यामुळे ग्रंथ व ग्रंथालये बंद होणार नाहीत़ तर त्यांच्यात बदलत्या काळानुरुप परीवर्तन करण्याकडे शासनाचे प्रयत्न चालले आहेत व ते योग्य त्या प्रमाणात होतील असेही यावेळी मान्यवरांकडून सांगण्यात आल़े ग्रंथालय संचालक म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रंथालय संगणकीकृत केले जातील असेही ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी सांगितल़े सुदाम राजपूत, बीपीन पाटील, नरेंद्र पाटील, कालुसिंग नाईक, पृथ्वीराज पटेल, सुनील मराठे, भरत गवळे आदींनी परिश्रम घेतल़े